Relationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: तुमचा पार्टनर तुमच्यासोबत खुश नाही हे कसं ओळखाल...

नात्यामध्ये जर तुमचा पार्टनर आनंदी नसेल तर त्याच्या वागणुकीत हे चार बदल जाणवतात.

Puja Bonkile

Relationship Tips For Happy Couple: कोणतेही नातं टिकण्यासाठी एकमेंकावर प्रेम असण्याबरोबरच विश्वास असणे देखील गरजेचे आहे.

जर नात्यात मोकळेपणा, विचारांची देवाण घेवाण नसेल तर ते नात जास्तकाळ टिकत नाही. या चार गोष्टींवरून तुम्ही ओळखु शकता की तुमचा पार्टनर तुमच्यासोबत खुश आहे की नाही.

अनेक वेळा तो आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलू शकत नाही की तो नात्यात त्याच्याशी खूश नाही.

ही एक गोष्ट सांगून गोष्टी सोडवण्याऐवजी तो अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे नात्यात दुरावा येतो.

Relationship Tips
  • बोलणे बंद करणे

जेव्हा एखादा माणूस अचानक आपल्या जोडीदाराशी कोणत्याही गोष्टीवर चर्चा करणे किंवा बरोबर-अयोग्य बद्दल वाद घालणे थांबवतो आणि शांत राहतो, याचा अर्थ असा होतो की तो त्याच्या नात्यात आनंदी नाही.

एवढेच नाही तर तो पार्टनरला त्याच्या जवळही येऊ देत नाही. विचारल्यावरही तो काहीही मोकळेपणाने बोलत नाही.

Work From Home
  • काम आणि छंदावर फोकस करणे

काही पुरुष नातेसंबंधातील समस्यांपासून वाचण्यासासाठी स्वतःला त्यांच्या छंदांमध्ये किंवा त्यांच्या कामवर फोकस करतात.

यासह, ते आपल्या जोडीदारापासून आणि त्यांच्याबरोबर वाटलेल्या जबाबदाऱ्यांपासून सहज दुर होतात. आपण त्याचे वागणे नातेसंबंधातील त्याच्या दुःखाचे लक्षण मानू शकता.

Relationship Tips For Happy Couple
  • टोमणे मारणे

जेव्हा पुरुष त्यांच्या नात्यात आनंदी नसतात, तेव्हा त्यांना त्यांच्या जोडीदाराचे ऐकणे आवडत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरून जोडीदारावर पुन्हा-पुन्हा ओरडतात. कधी कधी ते छोट्या गोष्टांवरून टोमणे देखील मारतात.

त्याचे वागणे बहुतेक वेळा नातेसंबंधातील निराशा आणि असंतोषाचे परिणाम असते. कारण आपले दुःख कसे व्यक्त करावे हे त्याला समजत नाही. त्याबद्दल पार्टनरशी कसे बोलावे हे कळत नाही.

Happy Couple
  • दुसऱ्या व्यक्तीसह वेळ घालवणे

जेव्हा नात्यात समस्या येतात तेव्हा सहसा असे मानले जाते की पार्टनर एकमेकांसोबत वेळ घालवला पाहिजे आणि मोकळेपणाने बोलले पाहिजे.

पण पुरुष मात्र याच्या उलट करतात. त्याच्या पार्टनरऐवजी, ते बाहेरील लोकांसोबत जास्त वेळ घालवतात. त्यांच्याकडून भावनिक आधार मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेक वेळा त्यांचे अफेअर  सुरू होतात .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT