Corn Flakes Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Corn Flakes Recipe: सिंपल कॉर्न फ्लेक्स खाऊन बोरं झालाय? मग ट्राय करा 'ही' चविष्ट डिश

Corn Flakes Recipe: कॉर्नफ्लेक्स सर्व घरांमध्ये सहज उपलब्ध असतात. तुम्ही यापासून एक चवदार पदार्थ तयार करू शकता.

Puja Bonkile

Corn Flakes Recipe: कॉर्नफ्लेक्स खायला अनेक लोकांना आवडते. कॉर्नफ्लेक्स खाणे देखील आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. बरेचदा लोक नाश्त्यात दुधासोबत कॉर्नफ्लेक्स खातात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक कॉर्नफ्लेक्स खातात.

कॉर्नफ्लेक्स हे ब्लडप्रेशरसाठी चांगले आहे आणि ते ग्लूटेन फ्री देखील आहे. बहुतेक लोक ते दुधात भिजवून रोज खातात. पण तुम्ही हे खाऊन बोर झाले असाल तर पुढील रेसिपी ट्राय करू शकता.

कॉर्नफ्लेक्स भजी

कॉर्नफ्लेक्सपासून बनवलेले हे कुरकुरीत भझे खायला खूप चविष्ट आणि स्वादिष्ट असतात. बेसनाच्या पिठात कॉर्नफ्लेक्स चांगले बुडवून त्यापासून भजे बनवू शकता.

बेसनाच्या पिठात मीठ, मिरची, धणे, आलं आणि इतर गोष्टी एकत्र करून मिक्स करावे. नंतर त्यात कॉर्नफ्लेक्स मिसळून भजे तळून घ्यावे.

कॉर्नफ्लेक्स बटाट्याची फिंगर्स

कॉर्नफ्लेक्स बटाटा फिंगर्स बनवण्यासाठी कॉर्नफ्लेक्सच्या चुरामध्ये मीठ, लसूण पावडर, मिरची आणि पेपरिका टाकून मिक्स करावे.

नंतर त्यात बटाटे टाकून बेक करावे किंवा तळून घ्यावे. जेणेकरून सर्वकाही चांगले शिजले जाईल आणि तुम्ही या कुरकुरीत स्नॅक्सचा आनंद घेऊ शकता.

कॉर्नफ्लेक्स उपमा

उपमा हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. हा पदार्थ रवा आणि भातासह अनेक घटकांच्या मदतीने बनवला जातो. तुम्ही उपमा बनवण्यासाठी रव्याऐवजी कॉर्नफ्लेक्सचा वापर करू शकता. कॉर्नफ्लेक्स पाण्यात भिजवून मऊ करावा.

मऊ झाल्यावर कढईत तेल घालून मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालाव्या. नंतर त्यात हिरव्या भाज्या टाकाव्या आणि तळून घ्या आणि कॉर्नफ्लेक्स देखील तळून घ्या आणि सर्व चांगले शिजवा. तुमचा कॉर्नफ्लेक्स उपमा तयार आहे.

कॉर्नफ्लेक्स आणि बदाम डेझर्ट

ही एक कुरकुरीत गोड रेसिपी आहे. जे तुम्ही बदाम आणि कॉर्नफ्लेक्सच्या मदतीने बनवू शकता. कॉर्नफ्लेक्सचा कुरकुरीतपणा आणि चॉकलेटचा गोडवा या पदार्थाला एक अनोखी चव देतो.

भाजलेले बदाम आणि तळलेले कॉर्नफ्लेक्स वितळलेल्या चॉकलेटच्या पिठात मिक्स केले जातात आणि नंतर ट्रेमध्ये ठेऊन सेट करतात. काही वेळाने चॉकलेट सेट झाल्यावर कापून खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT