Raw Papaya Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Raw Papaya Benefits: वजन कमी करण्यास मदत करते कच्ची पपई

कच्ची पपई खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कच्च्या हिरव्या पपईपासून भाजीही बनवली जाते.

Puja Bonkile

Raw Papaya Benefits: पपई खाणे पोटासाठी खूप फायदेशीर असते. पपई खाल्ल्याने पोटासंबंधित समस्या दूर होतात. तसेच अनेक पोषक आणि जीवनसत्त्वेही मिळतात. केवळ पिकलेली पपईच नाही तर कच्ची पपई आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

कच्च्या हिरव्या पपईपासून भाजी देखील बनवली जाते. यामध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. कच्च्या पपईपासून स्वादिष्ट भाजी बनवू शकता आणि ती उकळवून किंवा कोशिंबीर म्हणून कच्ची देखील खाऊ शकता. कच्ची पपई खाण्याचे फायदे कोणते आहेत हे जाणून घेऊया.

कच्ची पपई खाण्याने चमत्कारी फायदे

  • पोटासंबंधित समस्या

कच्ची पपई खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते. ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. त्यामुळे अॅसिडिटी, सूज आणि बद्धकोष्ठता या समस्याही दूर होतात.

  • डोळ्यांसाठी कच्ची पपई


कच्च्या पपईमध्ये कॅरोटीनोइड्स असतात. जे शरीरात व्हिटॅमिन अ तयार करतात. ते डोळ्यांसाठी चांगले असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही कच्ची पपई फायदेशीर असते. त्याचा आहारात समावेश करावा. 

  • वजन नियंत्रणात राहते


कच्च्या पपईमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. यामुळे ते वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. वजन कमी करण्यासाठी कच्च्या पपईचा आहारात समावेश करावा. तुम्ही कोशिंबीर किंवा उकडून कच्चे देखील खाऊ शकता.

  • डिटॉक्स

कच्ची पपई शरीराला नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर आहे. हे शरीरासाठी डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. कच्ची पपई खाल्ल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. यामुळे अनेक आजारांपासून शरीराचा बचाव होतो.

  • चमकदार त्वचा

कच्ची पपई जीवनसत्त्वांचा एक चांगला स्रोत आहे. ते त्वचेसाठी देखील चांगले आहे. चमकदार त्वचेसाठी कच्ची पपई खावी. हे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करते. शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकते आणि त्वचेसाठी देखील निरोगी राहते. कच्ची पपई खाल्ल्याने डाग आणि मुरुमांची समस्या दूर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT