Ram Temple Theme Saree Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ram Temple Theme Saree: बनारसी साडीवर अयोध्या राम मंदिराची थीम, देश-विदेशातून होतेय मोठी मागणी

अयोध्या राम मंदिर हे असे ठिकाण आहे जिथे संपूर्ण देश राम भक्तीत मग्न झाले आहे. दरम्यान, राम मंदिर थीम असलेल्या बनारसी साडीची मागणी वाढली आहे.

Puja Bonkile

Ram Temple Theme Saree: अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणार आहे. यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या दर्शनासाठी भाविक उत्सुक आहेत. अशातच राम मंदिराच्या 'थीम'वर बनवलेल्या बनारसी साड्यांची देश-विदेशात मागणी वाढली आहे. बनारसी साड्यांच्या पल्लूला सुंदर बनवण्यासाठी विणकर काम करत आहेत. विणकरांना साड्यांवरील विविध डिझाईन्ससाठी 'ऑर्डर' मिळाल्या आहेत, ज्यात साड्यांच्या पल्लूवरील राम मंदिराच्या दृश्यांसह प्रभू रामाच्या जीवनातील देखावे दर्शविणाऱ्या डिझाइन्सचा समावेश आहे.

ऐतिहासिक वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेल्या साड्यांना नेहमीच मागणी असते. परंतु राम मंदिर डिझाइन केलेल्या साड्या प्रथमच बाजारात दाखल झाल्या आहेत. राम मंदिर 'थीम' असलेल्या साड्या फॅशन जगतात खळबळ माजवण्यासाठी सज्ज आहेत. या साड्या परिधान करून 22 जानेवारी हा दिवस आपापल्या ठिकाणी साजरा करू इच्छिणाऱ्या देशातील विविध भागातील महिलांकडून 'ऑर्डर' प्राप्त झाल्या आहेत.

अयोध्या राम मंदिराच्या 'थीम'वर डिझाइन केलेल्या साड्यांवर पल्लूवर राम मंदिराचा शिलालेख आहे. या साड्या लाल आणि पिवळ्या रंगात बनवल्या गेल्या आहेत. शिलालेख सुवर्ण रंगात आहे. इतर प्रकारच्या साड्या अनेक रंगात उपलब्ध आहेत आणि अशा साड्यांवर बॉर्डवर श्री राम लिहिलेले आहे.

साडीचा तिसरा प्रकार भगवान श्रीरामाच्या बालपणापासून रावणाच्या मृत्यूपर्यंतच्या विविध लिलींचे चित्रण करतो. साडीच्या पदरावर राम दरबाराची प्रतिमा असलेल्या बनारसी साड्यांनाही मोठी मागणी आहे. राम मंदिर थीमवर आधारित साड्यांच्या ऑर्डर्स परदेशातून येत आहेत. या साड्यांची किंमत सात हजारांपासून एक लाखांपर्यंत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॅटरीचा राजा येतोय! Redmi 15 5G लाँचिंगसाठी सज्ज, 7000mAh बॅटरी करणार कमाल; जाणून घ्या अफलातून फीचर्स

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54.5 लाख पर्यटकांची नोंद, मंत्री रोहन खंवटेंची माहिती; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT