Ram Navami 2023 in Goa: रामनवमीचा दिवस म्हणजे हिंदू धर्मात पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता. रामाला युगपुरुष असे बालले जाते.
गेली अनेक शतके श्रीरामाची पूजा घरोघरी मनोभावे केली जाते आणि रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म दिवस घरोघरी साजरा केला जातो.
श्रीराम हे आदर्शचे प्रतीक आहे. यंदा रामनवमी 30 मार्च 2023 रोजी चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. माता दुर्गेची नवरात्रही (Navratri) याच दिवशी संपन्न होणार आहे.
देवळांमध्ये श्रीरामांच्या जन्माचा गजर केला जाईल. भक्तीभावात आणि आनंदात रामनवमी साजरी केली जाईल. रामाच्या दर्शनाला राम मंदिरांमध्ये भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते.
कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या नाही
रामनवमीच्या पूजेत काय करावे
राम नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि सूर्याला अर्ध्य द्यावे.
रामनवमीच्या दिवशी श्री रामचरितमानसचीही पूजा करावी.
भगवान श्रीरामांच्या पूजेमध्ये पिवळे वस्त्र, पिवळी फुले आणि पिवळे चंदन अर्पण करणे असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.
तुळशीची माळ श्रीरामांना अर्पण करावी.
तुळस ही भगवान श्रीविष्णूंना प्रिय आहे आणि भगवान श्रीराम हे श्रीविष्णूंचाच एक अवतार आहेत.
रामनवमीच्या दिवशी स्नान-दानाचे विशेष महत्त्व आहे
रामनवमीच्या दिवशी रामरक्षास्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे.
रामनवमीच्या पूजेत काय करू नये
श्री रामनवमीचे व्रत करणार्या व्यक्तीने इतरांबाबत द्वेष ठेउ नये.
या दिवशी उपवास करून ब्रह्मचर्य पाळावे.
रामनवमीच्या दिवशी कोणाचेही मन दुखवले जाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
रामनवमीच्या दिवशी एखाद्याला दुखावणं हे मोठं पाप मानलं जातं.
भगवान श्रीरामाच्या पूजेमध्ये शिळी फुले अर्पण करू नयेत.
रामनवमीच्या दिवशी पूजा करताना दिवा विझला तर तोच दिवा पुन्हा प्रज्वलित करु नका त्याऐवजी नवा दिवा लावावा.
रामनवमीच्या दिवशी सात्विक आहारच घ्यावा. इतर प्रलोभनांपासून दूर राहावं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.