Raksha Bandhan Special Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Raksha Bandhan Special Recipe: रक्षाबंधनाला काहीतरी हटके! ब्रेड बर्फी वाढवेल बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा

रक्षाबंधनला स्पेशल टच देण्यासाठी तुम्ही घरीच ब्रेडपासून चवदार बर्फी बनवू शकता.

Puja Bonkile

Raksha Bandhan Special Recipe: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण म्हणून ओळखला जातो. हा सण प्रेम आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते. त्याच वेळी, भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि हे नाते असेच राहो अशी प्रार्थना करतो.

हा सण यंदा 30 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. भावासाठी स्वत:च्या हाताने काही स्पेशल बनवायचे असेल तर तुम्ही ब्रेडपासून चवदार बर्फी तयार करू शकता.ही रेसिपी बनवायला अगदी सोपी असून झटपट तयार होणारी आहे.

  • ब्रेड बर्फी लागणारे साहित्य

ब्रेड- 1 पुर्ण पॅकेट

साखर- 1 कप

विलयची-5

तुप-5 चमच

खोबरा किस-3 चमच

खवा- 1 कप

पानी-1 कप

Barfi

ब्रेड बर्फी बनवण्याची कृती

स्टेप 1

ब्रेड बर्फी बनवण्यासाठी सर्वात पहिले ब्रेडच्या कडा चाकुच्या मदतीने कापुन घ्याव्या

स्टेप 2

नंतर गॅसवर एक भांडे ठेवून त्यात एक कप पानी, एक कप साखर आणि विलायची टाकून चांगला पाक तयार करून घ्यावा.

स्टेप 3

नंतर ब्रेडचा बारिक चुरा करून तुपात चांगले सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे.

स्टेप 4

नंतर ब्रेडमध्ये खवा, खोबऱ्याचा किस घालून चांगले मिक्स करावे.

स्टेप 5

नंतर हे मिश्रण थंड करण्यासाठी एका मोठ्या प्लेटमध्ये काढावे.

स्टेप 6

मिश्रण थंड झाल्यावर त्याचे बर्फीच्या आकारात तुकडे करावे.

स्टेप 7

त्यावर पिस्ता टाकून सजवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT