Vastu Tips For Rakshan Bandhan Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: रक्षाबंधनला करू नका या 6 चुका, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

Rakshan Bandhan 2023: यंदा रक्षाबंधन 30 आणि 31 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. पण वास्तुनुसार कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vastu Tips For Rakshan Bandhan: यंदा रक्षाबंधन हा सण 30 आणि 31 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनला भाद्र असल्याने सण दोन दिवस साजरा केला जाणार आहे.

भद्राकाल 31 ऑगस्ट रोजी सकाळी पौर्णिमेच्या तिथीसह सुरू होणार असून रात्री 9 पर्यंत असणार आहे. वास्तुनुसार काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

  • वास्तूनुसार कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी

भद्रकाळात राखी बांधू नये

भद्रकाळात भावाला राखी बांधणे अशुभ मानले जाते. भद्रकाळ 30 ऑगस्टला सकाळी पौर्णिमेच्या तिथीसह सुरू होणार असून रात्री 9 पर्यंत असणार आहे.

भेटवस्तु कोणती द्यावी

वास्तुनुसार रक्षाबंधनाच्या द्वशी टोकदार वस्तु भेट देऊ नये. आरसा किंवा फोटो फ्रेम भेटवस्तु देऊ नका. बहिणीला रूमाल, स्मार्ट वॉच, शूज यासारख्या वस्तु देऊ शकता.

Raksh Bandhan 2023

अशी राखी बांधु नका

मार्केटमध्ये प्लास्टिक राख्या उपलब्ध आहेत पण वास्तुनुसार अशा राख्या भावाला बांधु नका. तसेच तुचलेली राखी बांधणे अशुभ मानले जाते.

कपड्यांचा शुभ रंग

राखी बांधतांना चुकूनही काळी कपडे परिधान करू नये. तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता.

कोणत्या पदार्थांचे सेवन करावे

रक्षाबंधनच्या दिवशी मास, लसूण-कांदा तसेच मद्यपेय करू नये. कारण वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते. या दिवशी सात्विक पदार्थांचे सेवन करावे.

योग्य दिशा

वास्तुनुसार चुकूनही वायव्य दिशेला बसू नये, या दिशेला राखी बांधणे अशुभ मानले जाते. राखी बांधताना नेहमी उत्तर-पुर्व दिशेकडे पाहावे.

राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता?

यंदा रक्षाबंधनाचा सण 30 आणि 31 ऑगस्ट ला साजरा केला जाणार आहे. 30 ऑगस्टला दिवसभर भद्रकाळ असणार आहे. तुम्ही 30 ऑगस्टला रात्री 9 नंतर भावाला राखी बांधु शकता. तर 31 ऑगस्टला सकाळी 7 पर्यंत राखी बांधण्याचा शुभ मुहुर्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT