World Diabetes Day 2024 
लाइफस्टाइल

Prediabetes: प्री-डायबेटिक एक संधी मधुमेह रोखण्यासाठी; लक्षणे, काळजी आणि उपाय जाणून घ्या

World Diabetes Day 2024: प्री-डायबिटीज असलेल्या जवळपास 70 टक्के लोकांना एका दशकात टाइप 2 मधुमेह होऊ शकतो.

गोमन्तक डिजिटल टीम

World Diabetes Day 2024

भारत आता 'जागतिक मधुमेह कॅपिटल' म्हणून उदयास येत आहे. ICMR-INDAB कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार भारतातील 11 टक्के लोकसंख्येला मधुमेहाची लागण झालीय तर 15.3 टक्के लोकसंख्या प्री-डायबेटिक असू शकतो.

प्री-डायबेटिक डेटा अतिशय चिंताजनक आहे. प्री-डायबेटिक ही मधुमेहाची दिशेने होणारी वाटचालीची पूर्व सूचना आहे. शरीराची ग्लुकोजचे नियमन करण्याची क्षमता बिघडत चाललीय याचा संकेत यावेळी आपल्याला मिळतो.

प्री-डायबिटीज असलेल्या जवळपास 70 टक्के लोकांना एका दशकात टाइप 2 मधुमेह होऊ शकतो.

अनेकदा लक्षणे नसलेली, प्री-डायबिटीज ही एक सौम्य स्थिती असते आणि हळूहळू पुढे जाते. रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते परंतु अद्याप ती मधुमेहाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेली नसते.

पण, प्री-डायबिटीज मधुमेह होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यासाठी एक संधी असते. याकाळात जीवनशैलीत किरकोळ बदलांसह-नियमित शारीरिक व्यायम, संतुलित आहार, वजन व्यवस्थापन आणि काहीवेळा औषधोपचार यामुळे अनेकांना टाईप 2 मधुमेह होणे लांबणीवर किंवा टाळता देखील येऊ शकते, एंडोक्राइनोलॉजी आणि मानवी चयापचय, स्पर्श हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण रामचंद्र म्हणाले.

दरम्यान, एक बाब लक्षात घ्यायल हवी की प्री-डायबेटिसमध्ये सहसा कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत.

म्हणून, जोखीम असलेल्या व्यक्तींनी जागृत राहावे आणि त्यांना तहान, वारंवार लघवी, थकवा, अंधुक दृष्टी, अस्पष्ट वजन कमी होणे किंवा मान, बगला किंवा मांडीवर त्वचेवर काळे ठिपके दिसल्यास रक्तातील साखरेची चाचणी करुन घ्यावी.

यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मूत्रपिंडाचे नुकसान आणि न्यूरोपॅथी यासारख्या दीर्घकालीन आजार होण्याचा धोका कमी करता येऊ शकतो.

मधुमेह, लठ्ठपणा, तणावपूर्ण आणि निष्क्रिय जीवनशैली असे जोखीम घटक असलेल्यांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. प्री-डायबेटिस सौम्य असू शकतो, परंतु योग्य काळजीसह मधुमेह होणार नाही याची खबरदारी घेता येईल.

रक्तातील साखरेची तीव्र वाढ रोखण्यासाठी नियमित तपासणी आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) खाद्यपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

कमीतकमी 30 मिनिटांचा व्यायम जसे की चालणे, पोहणे किंवा बाइक चालवणे यामुळे ताकद तसेच इंसुलिन सुधारू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT