Potato Paneer Shots Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Potato Paneer Shots Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा बटाटा पनीर शॉट्स

स्नॅक्समध्ये चविष्ट पनीर शॉट्स बनवून तुम्ही तुमच्या मुलांना खायला देऊ शकता

दैनिक गोमन्तक

Potato Paneer Shots Recipe: लहान मुलांना बर्‍याचदा स्नॅक्समध्ये कुरकुरीत आणि स्वादिष्ट पदार्थ खायला आवडतात. त्यामुळेच बाजारपेठेत फ्रेंच फ्राईज आणि बटाट्याच्या पदार्थांकडे मुले आकर्षित होतात. 

पण जर तुम्हाला तुमच्या मुलाला या बाहेरच्या गोष्टींपासून वाचवायचे असेल तर तुम्ही घरीच स्नॅक म्हणून बटाटा पनीरचे शॉट्स तयार करू शकता. चवदार पनीर शॉट्स बनवणे देखील खूप सोपे आहे. मुलांनाही खायला खूप आवडेल. आपण ते स्टार्टर म्हणून देखील बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी.

  • बटाटा पनीर शॉट्स बनवण्यासाठी साहित्य

उकडलेले बटाटे - 2

पनीर क्यूब 1 कप

आले-हिरवी मिरची लसूण पेस्ट - 1/2 कप

अजवाइन - 1/2 टीस्पून

लाल तिखट 1/2 टीस्पून

हिरवी कोथिंबीर चिरलेली - 2ते 3 चमचे

बेसन - 1 वाटी

तळण्याचे तेल - 1 कप

चवीनुसार मीठ

बटाटा पनीर शॉट्स कसा बनवायचा

  • बटाटे पनीर शॉट्स बनवण्यासाठी बटाटे उकळवे आणि मॅश करा

  • यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं यांची पेस्ट तयार करावी.

  • नंतर पनीरचे छोटे तुकडे करा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

  • यानंतर एका मोठ्या भांड्यात बेसन घालून त्यात लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करावे.

  • नतंर थोडं थोडं पाणी घालून बेसनाचे जाडसर पीठ तयार करावे.

  • आता एका कढईत 1 टीस्पून तेल टाकून मध्यम आचेवर गरम करावे.

  • तेल गरम झाल्यावर त्यात हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट घालून परतून घ्या.

  • यानंतर त्यात मॅश केलेले बटाटे घालून मिक्स करावे.

  • काही वेळाने कोथिंबीर घालून मिक्स चांगले करावे.

  • आता बटाटे पॅनमधून काढून थंड होऊ द्या.

  • आता बटाट्याचे छोटे गोळे बनवा.

  • नंतर तयार केलेल्या बॉलच्या मध्यभागी पनीरचा तुकडा ठेवा आणि पुन्हा बंद करा.

  • असे करून सर्व गोळे तयार करावे.

  • गोळे तयार झाल्यावर कढईत तेल टाकून गरम करा.

  • तेल व्यवस्थित गरम झाल्यावर ते गोळे बेसनाच्या पिठात बुडवून तेलात घालून तळून घ्या.

  • सर्व बाजूंनी गोळे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

  • चविष्ट बटाटा पनीर शॉट्स तयार आहेत, सॉस बरोबर सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT