Batata Bread Roll Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Evening Recipe: संध्याकाळच्या चहासोबत घ्या बटाटाचे ब्रेड रोलचा आस्वाद

जर तुम्हाला लहान मुलांसाठी ब्रेड आणि मैद्याशिवाय टेस्टी ब्रेड रोल बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा

दैनिक गोमन्तक

Evening Snacks Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काही खास पदार्थांची मागणी अनेकदा असते. पण ब्रेड आणि मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी आरोग्याला हानी पोहोचवतात. अशा परिस्थितीत काहीतरी हेल्दी आणि टेस्टी बनवणे आवश्यक असते. जर तुमच्या मुलांनी तळलेले काहीतरी खाण्याची मागणी केली तर रव्याचे ब्रेड रोल बनवा आणि त्यांना खायला द्या. ते बनवायला जास्त वेळ लागणार नाही आणि टेस्टला सुद्धा चविष्ट आहे.

  • रव्याचे ब्रेड रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- 2 उकडलेले बटाटे

- 1 कांदा

- 3 हिरव्या मिरच्या

- 1 टीस्पून मीठ

- हळद

- भाजलेले जिरे अर्धा चमचा

- लाल तिखट,

- 1 टीस्पून धने पावडर

- अर्धा चमचा चाट मसाला

- 1/4 ओवा

- कोथिंबीर

- काळी मिरी पावडर

  • कृती

सर्वात पहिले रव्याचे पीठ तयार करा. यासाठी कढईत पाणी गरम करून त्यात हळद, तिखट, मीठ घालावे. त्यात रवा घालून मिक्स करा आणि पाणी मंद आचेवर कोरडे करा. जेव्हा पाणी सुकेल आणि पिठाची सुसंगतता येईल तेव्हा गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.

बटाट्याचे फिलिंग बनवण्यासाठी उकडलेले बटाटे मॅश करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला. ओवा, कोथिंबीर, काळी मिरी, चाट मसाला, भाजलेले जिरे आणि मीठ घालून मिक्स करा. आता हाताला तेल लावा आणि रव्याचे पीठ चांगले मळून घ्यावे.

ब्रेड रोल बनवण्यासाठी एका लहान भांड्यात रव्याचे पीठ भरून त्याचे प्रमाण निश्चित करा. आता हातावर पाणी लावून तळहातांच्या मदतीने सपाट करा. मध्यभागी बटाटा भरून ठेवून ते नीट बंद करा. आणि तळव्याने ब्रेड रोलचा आकार द्या. याप्रमाणे सर्व ब्रेड रोल तयार करा. कढईत तेल गरम करून सोनेरी होईपर्यंत तळा. रव्याचे चविष्ट ब्रेड रोल तयार आहेत. हिरव्या चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT