Pistachio Health Benefits  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pistachio Benefits: पिस्त्याचे सेवन हाडांना देईल बळकटी; वाचा याचे फायदे

सुका मेवा मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी चांगला असतो.

दैनिक गोमन्तक

Pistachio Benefits: सुका मेवा मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी चांगला असतो. बहुतेक लोक जेव्हा त्यांना थोडीशी भूक लागते तेव्हा त्याचे सेवन करतात, तर काहीजण दररोज त्यांच्या आहारात त्यांचा समावेश करतात. काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे आणि पिस्ता खाणे खूप फायदेशीर आहे.

सकस आहाराने आपण आपले आरोग्य तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत करू शकतो. प्रत्येकजण कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत आरोग्यदायी गोष्टींचा समावेश केला तर तुमचे शरीर निरोगी राहते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी पिस्ता उत्कृष्ट

पिस्ते खाण्यास चविष्ट तर असतातच पण त्यामध्ये अनेक पोषकतत्वे देखील असतात. पिस्त्यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, अमिनो अॅसिड तसेच जीवनसत्त्वे ए, के, सी आणि मॅंगनीज, कॅल्शियम यांसारखे पोषक घटक असतात.

जर तुम्ही हिवाळ्यात पिस्ता खाण्यास सुरुवात केली तर त्याचा तुमच्या शरीराला फायदा होतो. ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी पिस्ता खाणे खूप फायदेशीर आहे. पिस्त्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते, जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय पिस्ता डोळ्यांसाठी अप्रतिम आहे. कारण त्यात युटिन आणि झोक्सॅन्थिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट आढळतात.

पिस्ते नियमित खाल्ल्यास ते डोळ्यांसाठी खूप चांगले असते. पिस्ता खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. कारण त्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. तुम्हालाही तुमची हाडे आतून मजबूत करायची असतील, तर आजपासूनच तुमच्या आहारात पिस्त्याचा समावेश करा.

या ड्रायफ्रूटमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे, हे तुमच्या कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाच्या समस्यांमध्ये देखील खूप उपयुक्त आहे. कारण पिस्त्यात असलेले पोषक तत्व कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT