Feeling Extreme Cold | Winter Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Tips : हिवाळ्यात काही केल्या थंडी जात नाही? मग आहारात या गोष्टींचा करा समावेश

हिवाळा आला की काही लोकांना अशी समस्या असते की त्यांना इतर लोकांपेक्षा जास्त थंडी जाणवते.

दैनिक गोमन्तक

हिवाळा आला की काही लोकांना अशी समस्या असते की त्यांना इतर लोकांपेक्षा जास्त थंडी जाणवते. त्यांनी कितीही उबदार कपडे घातले तरी त्याची थंडी दूर होत नाही. अनेक लोक हिवाळ्यात तासनतास एकाच जागी बसतात, त्यामुळे त्यांच्यात रक्ताभिसरण कमी होते आणि शरीराचे अवयव थंड होऊ लागतात.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमचे शरीर थोडे सक्रिय ठेवले आणि काही गोष्टींचा आहारात समावेश केला तर, ज्यामुळे रक्त प्रवाह वेगाने वाढण्यास आणि सुधारण्यास मदत होते. यामुळे हिवाळ्यातही तुम्हाला उबदारपणा जाणवेल. हिवाळ्यात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करू शकता ते जाणून घ्या. (Feeling Extreme Cold)

या गोष्टींमुळे थंडीपासून मिळेल आराम

  • डाळिंब : डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट घटक असतात, जे शरीरातील रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करतात आणि रक्तातील ऑक्सिजनचा प्रवाह चांगला ठेवतात. त्यामुळे शरीरात उष्णता राहून आरोग्याला अनेक फायदे होतात.

  • कांदा : कांद्यामध्ये असे अनेक अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे रक्ताभिसरण सुधारण्याचे आणि शरीराला उष्णता देण्याचे काम करतात. हिवाळ्यातही कांद्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

  • दालचिनी : शरीराला उबदार ठेवण्यासाठी तुम्ही अन्न किंवा चहामध्ये दालचिनीचा वापर करू शकता. हा एक गरम मसाला आहे जो शरीराला उबदार करतो. तथापि, ते फक्त कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे.

  • लसूण : रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये लसणाचा वापर केला जातो. हे रक्तवाहिन्यांना आराम देते आणि ऊतींमध्ये रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करते.

  • फॅटी फिश : ओमेगा 3 फॅटी ऍसिड शरीरात रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी नायट्रिक ऑक्साईडला प्रोत्साहन देतात ज्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि रक्त प्रवाह वाढतो.

  • इतर गोष्टी : याशिवाय बीटरूट, हळद, हिरव्या पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळे, अक्रोड, टोमॅटो, आले यांचा आहारात समावेश करून तुम्ही तुमचे शरीर उबदार ठेवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT