Pediatric Liver Disease  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

लहान मुलाच्या यकृताला हानी पोहोचवणारा काय आहे Pediatric Liver Disease? जाणून चाचण्या, प्रतिबंधात्मक उपाय अन् तज्ञांचा सल्ला

Pediatric Liver Disease Symptoms & Prevention: आजच्या बदलत्या जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि अनुवांशिक कारणांमुळे केवळ मोठ्यानांच नाही तर लहान मुलांनाही यकृताशी संबंधित आजार झपाट्याने होत आहेत. यापैकी एक म्हणजे पीडियाट्रिक लिव्हर डिसीज.

Manish Jadhav

आजच्या बदलत्या जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि अनुवांशिक कारणांमुळे केवळ मोठ्यानांच नाही तर लहान मुलांनाही यकृताशी संबंधित आजार झपाट्याने होत आहेत. यापैकीच एक आजार म्हणजे पीडियाट्रिक लिव्हर डिसीज, जो मुलांसाठी घातक ठरु शकतो. चला तर मग मुलांचे यकृत कसे खराब होते? या आजाराची लक्षणे काय आहेत? आणि मुलांना त्यापासून कसे वाचवता येईल याविषयी सविस्तररित्या तज्ञांकडून जाणून घेऊया...

पीडियाट्रिक लिव्हर डिसीज

दरम्यान, मुलांमध्ये यकृताचा आजार सामान्यतः क्वचितच दिसून येतो, परंतु पीडियाट्रिक लिव्हर डिसीज मुलांच्या यकृताला हानी पोहोचवू शकतो. याबद्दल एम्स दिल्लीचे डॉ. राकेश कुमार बागडी सांगतात, पीडियाट्रिक लिव्हर डिसीज म्हणजे मुलांमध्ये यकृताशी संबंधित आजार. जन्मापासून ते पौगंडावस्थेपर्यंतच्या मुलांमध्ये ही समस्या उद्भवू शकते. हा एकच आजार नाहीतर यकृताशी संबंधित अनेक प्रकारच्या आजारांचा समूह आहे. जो हळूहळू मुलांच्या यकृताला हानी पोहोचवतो.

अमेरिकन लिव्हर फाउंडेशनच्या मते, फॅटी लिव्हर डिसीज (Non-Alcoholic Fatty Liver), व्हायरल हेपेटायटीस (Hepatitis A, B, C), ऑटोइम्यून हेपेटायटीस, मेटाबॉलिक लिव्हर डिसीज हे काही आजार आहेत, जे यकृताचे आरोग्य (Health) बिघडवू शकतात.

मुलांमध्ये हा यकृताचा आजार का होतो?

डॉ. राकेश कुमार सांगतात, मुलांमध्ये यकृताचे हानी होण्याची अनेक कारणे असू शकतात. जन्मापासून यकृताच्या रचनेत दोष, आनुवंशिक समस्या, विषाणू संसर्ग (जसे की हिपॅटायटीस विषाणू), शरीरात एंजाइमची कमतरता, रोगप्रतिकारक शक्तीचे अयोग्य कार्य, जास्त चरबी किंवा साखर असलेले अन्न खाणे यामुळे ही समस्या वाढते. तथापि, आजारानंतर मुलांमध्ये काही लक्षणे दिसतात, ज्याकडे दुर्लक्ष करु नये.

जर मूल वारंवार आजारी पडत असेल, त्याचे वजन योग्यरित्या वाढत नसेल किंवा वारंवार उलट्या होत असतील तर हे यकृताच्या आजाराचे लक्षण असू शकते. याशिवाय, त्वचा किंवा डोळे पिवळे होणे (कावीळ), फुगलेले पोट, गडद लघवीचा रंग, विष्ठेचा रंग, थकवा आणि अशक्तपणा आणि भूक न लागणे ही त्याची लक्षणे असू शकतात. ही लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.

'या' आजारावर कोणत्या चाचणी आहेत?

डॉ. राकेश सांगतात, डॉक्टर बाळाच्या लक्षणांवर आधारित काही चाचण्या करतात. ब्लड तपासणी, अल्ट्रासाऊंड किंवा सीटी स्कॅन, बायोप्सी आणि जेनेटिक चाचणी या अनुवांशिक रोगाची शक्यता असल्यास केली जाते. उपचार रोगाच्या तीव्रतेवर आणि प्रकारावर अवलंबून असतात. काही प्रकरणांमध्ये औषधे स्थिती सुधारतात, परंतु गंभीर परिस्थितीत यकृत प्रत्यारोपणाची गरज भासू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT