पोस्ट-कोव्हिड रिकव्हरी प्रोग्रॅम 
लाइफस्टाइल

लाँग कोविडची लक्षणं आहेत? तर 'पोस्ट-कोव्हिड रिकव्हरी प्रोग्रॅम'मध्ये सहभागी व्हा

कोविडवर मात केल्यानंतरही अनेकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाले आहेत.

Priyanka Deshmukh

चीनच्या वुहान प्रांतातून फैलाव झालेल्या कोरोना विषाणूने आज संपूर्ण जगाला कवेत घेतलं आहे. गेल्या दीड वर्षांपासून प्रत्येक जण या विषाणूच्या त्रासाला सामोरा जात आहे. देशातही या विषाणूने थैमान घातलं आहे. मात्र, हळूहळू त्याचा उद्रेक कमी होत आहे. परंतु, कोविडवर मात केलेल्या अनेक रुग्णांमध्ये लाँग कोविडची लक्षणं दिसून येत आहेत. सोबतच या नव्या त्रासाविषयी फारशी माहिती नसल्यामुळे सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. (Participate in the Post Covid Recovery Program)

त्यामुळे साहजिकच सर्वत्र नैराश्य आणि नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, या परिस्थितीत सगळ्यांनी शांत व संयमाने राहणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे जर या काळात तुम्हाला मन स्थिर ठेवायचं असेल तर योगचा आधार घेणं नक्कीच फायद्याचं ठरेलं. तत्पूर्वी लाँग कोविडमध्ये नेमकं काय होतं, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर योगच्या माध्यमातून कशी मात करावी ते जाणून घेऊयात.

कोविडवर मात केल्यानंतरही अनेकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांमध्ये काही सर्वसामान्य लक्षणं आढळून येत आहेत. ही लक्षणं पुढीलप्रमाणे -

  • १.श्वास घेताना त्रास होणे

  • २. थकवा

  • ३. धाप लागणे

  • ४. अशक्तपणा

  • ५. सतत झोप येणे

  • ६. चिंता वाटणे

  • ७. भीती वाटणे

  • ८. निद्रानाश होणे

  • ९. वजन कमी होणे

  • १०. स्नायू कमकुवत होणे

  • ११. आत्मविश्वास कमी होणे

  • १२. ब्रेन फॉग

  • १२. एकाग्रता कमी होणे

  • १३ ताण येणे

लाँग कोविडच्या समस्येमुळे सध्या असंख्य जण त्रस्त असून त्यांच्यात वरील सर्वसामान्य लक्षणं प्रकर्षाने जाणवत आहेत. म्हणूनच, नागरिकांमधील भीती, चिंता दूर करण्यासाठी, त्यांनी गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी ‘सकाळ’ व ‘योग ऊर्जा’ यांनी एकत्रितपणे 'पोस्ट-कोव्हिड रिकव्हरी प्रोग्रॅम'चं आयोजन केलं आहे. या प्रोग्रॅममध्ये लाँग कोविडच्या काळात सकारात्मक कसं रहावं, कोणती योगासने व प्राणायाम केल्यावर श्वसन संस्थेचं कार्य सुधारेल, पचन संस्था सुधारेल, स्नायूंचे बळकटीकरण होईल, स्टॅमिना वाढेल, ताण-चिंता-भीती कमी होईल, अशक्तपणा दूर होईल, झोपेच्या समस्या दूर होतील, एकाग्रता वाढेल आणि पुन्हा तुमच्या आरोग्याचे पुनर्वसन होऊन सकारात्मकता निर्माण होईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT