Parenting Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Parenting Tips: 16 वर्षापूर्वी मुलांना 'या' गोष्टी शिकवा, वाढेल आत्मविश्वास

जर तुम्ही मुलांना वयाच्या 16 वर्षापूर्वी काही चांगले आणि महत्त्वाचे काम शिकवले तर ते त्यांचे काम आत्मविश्वासाने पुर्ण करतात.

Puja Bonkile

Parenting Tips: मुलांचे चांगले संगोपन करणे सोपे काम नाही. ही पालकांची जबाबदारी आहे, जी मुलांना यशस्वी व्यक्ती बनण्यास मदत करते. अशावेळी योग्य वयात मुलांना महत्त्वाच्या गोष्टी शिकवणे ही पालकांची जबाबदारी आहे.

जर मुले किशोरवयात प्रवेश करत असतील तर त्यांना अशा काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतील. जर तुम्ही त्यांना वयाच्या 16 वर्षापूर्वी काही चांगले आणि महत्त्वाचे काम शिकवले तर ते स्वावलंबी होऊन यशाचा मार्गावर जातील.

पैशांचे नियोजन

जर तुमचे मूल 15 वर्षांचे झाले असेल, तर त्याच्यासाठी बँकत अकाऊंट ओपन करावे. त्यांना त्यांच्या शाळेचे बजेट कसे करायचे, खेळ आणि प्रवासासाठी बचत कशी करायची ते शिकवा. चेक लिहिणे आणि ठेवी वगैरे शिकवावे. यामुळे त्यांना पुढे बिवष्यात अडचणी येणार नाही.

घरी एकटे राहणे

जेव्हा तुम्ही मुलांना काही तासांसाठी घरी एकटे सोडता तेव्हा ते त्यांना घराची काळजी घेण्यास आणि जबाबदार बनण्यास मदत करते. म्हणून, त्यांना कधीकधी घरी एकटे सोडणे सुरू करा. त्यांना सुरक्षा नियम देखील सांगावे.

एकट्याने प्रवास करणे

हे असे वय असते जेव्हा त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि जबाबदारीने वागणे शिकवते. अशावेळी घर ते शाळेत किंवा शाळेतून घरापर्यंत कसे यावे किंवा ट्रान्सपोर्टबद्दल माहिती द्यावी. अशा प्रकारे ते स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकतील.

कपडे स्वच्छ करणे

मुलांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे कपडे कसे स्वच्छ करावेत, उन्हात वाळवावेत, रंगीत कपडे आणि पांढरे कपडे स्वच्छ करताना काळजी घ्यावी, डाग कसे काढावेत इत्यादी शिकवणे फायदेशीर ठरते.

प्रथमोपचारपेटीबद्दल माहिती

आजार, दुखापत, खोकला, सर्दी इत्यादीवेळी कोणते औषध द्यावे लागेल, प्रथमोपचार कसे द्यावे इत्यादी माहिती द्यावी. एवढेच नाही तर कुटुंबातील एखादा सदस्य आजारी असेल तर त्याची काळजी कशी घ्यायची याची सर्व माहितीही द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT