Parenting Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Parenting Tips: तुमची मूलं देखील मूडी असेल तर 'असा' करा सांभाळ

तुमची मूलं कधी शांत तर कधी चिडचिड आणि कधी खोडकरपण करत असेल तर अशा मुलांना कसे सांभाळायचे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Parenting Tips: मुलांचा सांभाळ करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. तुम्ही मुलांना जे काही वातावरण द्याल, ते भविष्यात त्यानुसार जुळवून घेतात. घरात रोज भांडणे होत असतील, शाळेत शिक्षकांची वागणूक मुलाशी चांगली नसेल, शेजारच्या घरात रोज काही ना काही कुरबुरी होत असतील तर त्याचा वाईट परिणाम त्यांच्या मनावर होतो. यामुळे ते हट्टी, चिडचिड आणि उद्धट बोलू शकतात.

त्यांना सांभाळ हे एक आव्हान आहे. ही समस्या किशोरवयीन मुलांमध्ये अधिक दिसून येते. कारण या काळात त्यांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. इतरही अनेक कारणे आहेत. अशा मुलांसोबत शांतपणे बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.

हायपर होऊ नका

प्रत्येक क्षणी अशा मुलांच्या बदलत्या मूडमुळे तुमचा मूड खराब करू नका. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना जास्त ओरडू नका. त्यांनी केलेल्या चुका शांतपण लक्षात आणून द्या. प्रत्येक वेळी मारणे आणि ओरडणे हा उपाय नसतो.

भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्या

मूडी मुलांना व्यवस्थित सांभाळ्यासाठी पहिला मार्ग म्हणजे त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. जेणेकरुन मुलं कोणत्याही भीतीशिवाय त्यांच्या भावना तुमच्याशी शेअर करू शकतील. अशा मुलांसोबत शांतपणे बसून त्यांच्याशी बोलल्याने त्यांना बरे वाटेल आणि तुमच्यासाठीही असे करणे चांगला होईल.

घरातील वातावरण सकारात्मक ठेवावे

अनेक वेळा कौटुंबिक वातावरणही मुलांच्या अशा स्वभावाला कारणीभूत असु असते. घरात रोजच भांडणे होत असतील, कुणी कुणाशी छान बोलत नसेल, शिवीगाळही होत असेल, तर मुलाचा रागीट, चिडचिड होणे स्वाभाविक आहे. याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याला सामोरे जाण्यासाठी घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा.

नात्यातील प्रेम आणि आपुलकी, मोठ्यांचा आदर, एकत्र राहण्याची सवय मुलांना चांगल्या सवयी लावण्यास मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Shikhar Dhawan: बांगलादेशातील हिंदू महिलेवरील अत्याचारावर संतापला 'गब्बर'; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "अशी हिंसा सहन केली जाणार नाही!"

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT