Papaya Halwa Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Papaya Halwa Recipe: पपईचा शिरा कधी खाल्लाय का? आरोग्यासाठी असतो खूप फायदेशीर

गाजर शिरा खाउन बोर झाला असाल तर हा शिरा नक्की ट्राय करुन पाहा.

दैनिक गोमन्तक

निरोगी आरोग्यासाठी फळं खाणे चांगले असते. फळांमध्ये पपई खाणे अधिक चामगले मानले जाते. पपई खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच यामुळे पचन देखील चांगले होते. पपईचा शिरा तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो.

पपईचा शिरा चवीला अप्रतिम आहे. जर तुम्हाला गोड खाण्याची आवड असेल तर तुम्ही पपईच्या शिरा ट्राय करू शकता. पौष्टिक पपईचा शिरा बनवायलाही खूप सोपा आहे आणि तुम्ही काही मिनिटांत तयार करू शकता.चला तर मग जाणून घेउया रेसिपी

  • पपईचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पिकलेली पपई - 1

दूध - अर्धा लिटर

विलायची पावडर - 1/2 टीस्पून

बारिक चिरलेली ड्रायफ्रुट्स - 1 टेस्पून

तूप - 2 चमचे

साखर - 1/2 कप

  • पपईचा शिरा बनवण्याची कृती

पपईचा शिरा बनवण्यासाठी सर्वात पहिले एक पिकलेली पपई घ्या.

आता पपईची जाड साल काढून त्याचे मोठे तुकडे करा.

आता कापलेले तुकडे एका भांड्यात वेगळे ठेवा. यानंतर एका भांड्यात देशी तूप टाकून मध्यम आचेवर गरम करा.

तूप पूर्णपणे मेल्ट झाल्यावर त्यात पपईचे चिरलेले तुकडे घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. पपईचे तुकडे चांगले मॅश करून घ्या.

आता मॅश केलेल्या पपईमध्ये दूध घालावे आणि मिश्रण शिजू चांगले द्या.

कढईतून दूध पूर्णपणे कोरडे होईपर्यंत ते शिजवावे. यानंतर वेलची पूड टाका आणि मिक्स करा.

आणखी 1 मिनिट शिजवल्यानंतर हलव्यात ड्रायफ्रुट्स टाका

शिरा चांगला शिजला आणि सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा. पईचा शिरा तयार आहे. ड्रायफ्रुट्सने सजवा आणि सर्व्ह करा.

  • पपई खाण्याचे फायदे

कोलेस्टेरॉल कमी करते

पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृद्यविकाराचा धोका संभवतो.

वजन कमी

एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा 200% अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Goa Minister Resigned: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा राजीनामा; गुरुवारी तवडकर, कामत घेणार शपथ

Asia Cup 2025: ‘...काही फरक पडत नाही’, भारत-पाकिस्तान सामन्यावर वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य; पाहा काय म्हणाले VIDEO

Viral Video: ‘डिग्रीची किंमत घटली...’! फिरायच्या नादापायी केलं ट्रक ड्रायव्हरसोबत लग्न; महिलेचा अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Toyota Camry Sprint: हायब्रिड सेडान सेगमेंटमध्ये टोयोटाचा पुन्हा धमाका! स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स 'कॅमरी स्प्रिंट एडिशन' लॉन्च

SCROLL FOR NEXT