Papaya Side Effects Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Papaya Side Effects : 'या' लोकांनी चुकूनही पपई खाऊ नये, अन्यथा शरीरातून सुरू होईल रक्तस्त्राव

ज्या लोकांमध्ये साखरेची पातळी कमी आहे, त्यांनी पपईचे अजिबात सेवन करू नये.

दैनिक गोमन्तक

Papaya Side Effects : पपई खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामध्ये मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन, फायबर असे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात.

याचे सेवन केल्याने शरीराचे वजन नियंत्रणात राहते आणि हृदयाचे काम व्यवस्थित होते. पोटाची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यामध्येही त्याचा फायदा होतो. इतके फायदेशीर फळ असूनही काही परिस्थितीत पपई खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पपई अजिबात खाऊ नये.

पपईचे दुष्परिणाम

  • कमी साखर पातळी

ज्या लोकांमध्ये साखरेची पातळी कमी आहे, त्यांनी पपईचे अजिबात सेवन करू नये. असे केल्याने त्यांच्या अडचणी वाढू शकतात. जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाऊ नये.

  • गरोदरपणात

गरोदरपणात पपई खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. यामध्ये असलेले पॅपेन शरीरातील पेशींच्या पडद्याला हानी पोहोचवू शकते. गर्भात वाढणाऱ्या मुलाच्या विकासासाठी हा पडदा अत्यंत महत्त्वाचा असतो. यामुळेच गर्भवती महिलांना पपई न खाण्याचा सल्ला दिला जातो.

  • ऍलर्जी

ज्यांना कोणत्याही प्रकारची त्वचेची ऍलर्जी आहे त्यांनी पपई खाणे टाळावे. याचे सेवन केल्याने शरीरावर लाल डाग पडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, सूज येणे असे त्रास होऊ शकतात.

  • औषधानंतर पपई खाणे

काही लोक पपई खाल्ल्यानंतर लगेच औषध घेण्याची चूक करतात. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरे तर पपईचे आणि औषधे मिळून शरीरातील रक्त पातळ करतात. त्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. म्हणूनच अशा लोकांनी पपईचे सेवन करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

Goa ZP Election: मनोज परब आणि सरदेसाईंना हव्या असणाऱ्या जागा वगळता काँग्रेसची यादी फायनल, लवकरच होणार जाहीर; पाटकरांनी स्पष्टच सांगितलं

Goa Politics: "दाल में कुछ काला है!", सरदेसाईंचा भाजपवर हल्ला; विरोधी पक्षांना दिला '30-10-10'चा फॉर्म्युला

Goa Live News: झेडपी निवडणुकीच्या तयारीसाठी 'आप'ने जाहीर केले नवे पदाधिकारी

Terror Attack: 'लश्कर' आणि 'जैश'चा भयानक कट! काश्मीरसह दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये मोठ्या हल्ल्याचा डाव; गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर

SCROLL FOR NEXT