Palmistry Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Palmistry: तुमच्या हातावर आहेत का राहु रेषा? मग प्रचंड धनाचे मालक होण्यासाठी तयार राहा

काही लोक एवढे भाग्यवान असतात की त्यांना धनलाभ होतो.

Puja Bonkile

Palmistry: हस्तरेषाशास्त्रात काही रेषा आणि चिन्हे अतिशय शुभ मानली जातात. ज्या लोकांच्या हातात या खास रेषा, चिन्हे किंवा आकृत्या असतात ते खूप भाग्यवान समजले जातात. असे लोक भाग्य घेऊन जन्माला येतात आणि प्रचंड संपत्तीचे मालक बनवतात.

त्या लोकांना जीवनात खूप मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. अशीच एक रेषा म्हणजे राहू रेषा आहे. तळहातावर राहु रेषा असेल आणि ती शुभ स्थितीत असेल तर तो व्यक्ती खूप श्रीमंत होतो. तसेच तो व्यक्ती राजेशाही जीवन जगतो.

ज्याप्रमाणे कुंडलीत राहू ग्रहाची स्थिती खूप महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे तळहातातील राहू रेषा आणि राहू पर्वताची स्थिती खूप महत्त्वाची असते. राहु रेषा तळहातात शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीला पैसा आणि मान-सन्मान मिळतो.

राहू रेषा हाताच्या मध्यभागी असते. तळहातातील मंगळाच्या क्षेत्रातून बाहेर पडणारी एखादी रेषा जीवनरेषा आणि भाग्यरेषेला जोडते आणि शिररेषेला स्पर्श करते तेव्हा तिला राहू रेषा म्हणतात. काहीवेळा राहु रेषा डोक्याची रेषाला जोडून हृदय रेषेपर्यंत पोहोचते. तसेच काही लोकांच्या हातात एकापेक्षा जास्त राहू रेषा असतात.

  • राहु रेषा

तळहातावर एकापेक्षा जास्त राहू रेषा असतील तर अशी व्यक्ती खूप भाग्यवान असते.

असे लोक मोठे नेते होतात किंवा उच्च पदावर कार्यकत असतात.

सहसा असे लोक मोठे नेते, प्रशासकीय अधिकारी बनतात.

जर राहु रेषा अगदी स्पष्ट असेल किंवा इतर कोणत्याही रेषेने ती तुटलेली नसेल तर ही स्थिती देखील खूप शुभ मानली जाते.

असे लोक आपल्या आयुष्यात खूप नाव कमावतात. त्यांना देश-विदेशात देखील प्रवास करण्याचा योग येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

Election Commission Form 6 Removed: झंझट संपली! फॉर्म-6 सोबत आता द्यावे लागणार नाही ॲडिशनल डिक्लेरेशन; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT