Onion Salad Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Raw Onion Benefits: कच्चा कांदा खाल्ल्याने अनेक आजारांपासून मिळू शकते मुक्ती

कच्च्या कांद्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शिअमसारखे पोषक घटक असतात. यामुळे याचा समावेश आहारात करावा.

Puja Bonkile

Onion Benefits: कच्चा कांदा जवळजवळ प्रत्येक पदार्थांमध्ये वापरला जातो. यामुळे त्या पदार्थांची चव अधिक वाढते. अनेक लोक सॅलेडमध्ये कच्चा कांदा वापरतात. अनेक लोक कांदा खाणे टाळतात. पण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कच्च्या कांद्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शिअमसारखे पोषक घटक असतात. यामुळे अनेक शारीरीक समस्या दूर होतात.

  • हाडांचे निरोगी आरोग्य

कांद्यामध्ये सल्फर पुरेशा प्रमाणात असते.यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहते. यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका टाळण्यासही मदत होते.

  • स्मरणशक्ती वाढते

कच्चा कांदा खाल्याने स्मरणशक्ती वाढते. यामध्ये सल्फर घटक असते जे मेंदुसाठी फायदेशीर असते. तसेच एकाग्रता वाढण्यास मदकत मिळते.

  • रक्तातील साखर नियंत्रणात राहते

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कच्चा कांदा खावा. यामुळे मधुमेहचा धोका कमी होतो

  • चमकदार त्वचा

आरोग्यासह त्वचेसाठी देखील कांदा फायदेशीर ठरतो. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट असतात. जे त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. तसेच कच्चा कांदा खाल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते

कच्चा कांदा खाल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबुत होते. तसेच सर्दी, खोकला सारखे आजार दूर राहतात. यामुळे कच्च्या कांद्याचा आहारात समावेश करावा. तसेच शरीरात पांढऱ्या रक्त पेशा तयार होण्यास मदत मिळते.

  • पचन सुलभ होते

कच्च्या कांद्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. जे पचनासाठी आवश्यक असते. तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. कच्चा कांदा खाल्ल्याने तुम्ही बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यासारख्या समस्यांपासून दूर राहू शकता.

  • सुज कमी होते

कच्च्या कांद्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे शरीरावरची सुज कमी करण्यास मदत करतात. हे संधिवात, दमा सारख्या समस्या दूर ठेवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

SCROLL FOR NEXT