Omega-3 Fatty Acid शाकाहारी लोकांसाठी गुणकारी Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Omega-3 Fatty Acid शाकाहारी लोकांसाठी गुणकारी

आक्रोडमध्ये (Walnut) ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते.

दैनिक गोमन्तक

ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे (Omega-3 Fatty Acid) फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि दृष्टी चांगली राहण्यासाठी लाभदायी आहे. ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे प्रमाण वाढण्यासाठी शाकाहारी लोकांनी या पदार्थांचे सेवन करावे. चला तर मग जाणून घेवूया कोणते आहेत हे पदार्थ.

जवस (Linseed) आणि चीया यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. हे पदार्थ मॅग्नेशियम, लोह आणि फायबर यासारख्या पोषक तत्व देखील असतात. यामुळे कॉलेस्टेरॉलशी लढण्यास मदत मिळते. तसेच पचनशक्ती सुरळीत चालण्यास मदत मिळते.

आक्रोडमध्ये (Walnut) ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. तसेच अक्रोड आपल्या आरोग्यासाठी (Health) आणि त्वचेसाठी (Skin) फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये असलेल्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्समुळे आपल्या रक्तातील साखर आणि कॉलेस्टेरॉलची पातळी सुधारते.

सोयाबीनमध्ये (Soybean) ओमेगा-3 फॅटी अॅसिड (Omega-3 Fatty Acid) मुबलक प्रमाणात असते. तसेच फायबर आणि प्रथिने यांचे चांगले स्त्रोत आहे. सोयाबीनचे सेवन केल्याने हृदयाचे (Heart) आणि हाडांचे (Bones) आरोग्य चांगले राहते. तसेच शरीरातील कॉलेस्टेरॉलची पातळी (Cholesterol levels) कमी करण्यास मदत करते.

ब्लूबेरीमध्ये (Blueberries) कॅलरीजचे प्रमाण कमी असते. यात पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ब्लूबेरीचे सेवन केल्याने हृदयासंबंधित असलेले आजार आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.

ब्रसेल्स स्प्राउट्समध्ये (Brussels sprouts) ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. या हिरव्या भाजीमध्ये जीवनसत्व 'के' आणि 'सी' मुबलक प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT