health Care Tips : स्वादुपिंड (Pancreatic) आपले आरोग्य चांगले (Health) ठेवण्याचे काम करते. पचनसंस्थेतील (Digestive system) अतिशय महत्वाचा तसेच लहान आतड्याचा पहिला भाग हा स्वादुपिंड (Pancreatic) होय. आपल्या शरीराच्या आतड्यातील पुढच्या भागात हे असते. शरीरातील अन्न पचण्यास मदत करणाऱ्या हार्मोन्स (Hormones) आणि एन्जाईमच्या उत्पादनास मदत करण्यासाठी मदत करते. आपल्या शरीरात (Body) तयार होणारे ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवते. तसेच शरीरातील फॅट (Fat) , प्रोटिन (Protein) आणि कार्बोहायड्रेट (Carbohydrates) कमी करण्यास शरीरातील डायजेस्टिव्ह एन्जाईम तयार करण्याचे काम स्वादुपिंड करते. आपल्या शरीरातील कार्बोहायड्रेट प्रमाण कमी झाल्यास वजनात (Weight) वाढ होऊ शकते. तसेच शरीरात थकवा जाणवेल लागतो.
कोणता आहार महत्वाचा :
आपल्या रोजच्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. यासाठी आहारात ब्रोकोली , कोबी आणि पालक यासारख्या भाज्यांचा आहारात समावेश केल्याने स्वादुपिंडस खूप फायदा होतो. तसेच लसूण खाल्याने सुद्धा स्वादुपिंडस फायदा होतो. यात अॅंटी एम्फ्लामेन्ट्री हे घटक असतात. यामुळे रक्तदाब नियंत्रात राहते.
प्रत्येकांच्या घरात तूप हे बनवल्या जातेच. परंतु सर्वानाच तूप आवडते असे नाही. तरीसुद्धा आपल्या आरोग्याच्या फायद्यासाठी तूप खाणे गरजेचे आहे. तसेच नारळ तेल , ऑलिव्ह ऑईलचे सेवन केल्याने स्वादुपिंडचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. तसेच अनेकांना अॅसिडिटीचा खूप त्रास असतो. अशा लोकांनी चहा आणि कॉफी चे सेवन टाळावे. या एवजी कॉफीन फ्री पेयाचे सेवन करावे. कॅफीनमुळे स्वादुपिंडात अॅसिडिटी तयार करणारे घटक निर्माण होतात. तसेच बाहेरील जंक फूड खाल्ल्याने स्वादुपिंडाला डायजेस्टिव्ह एन्जाईमची निर्मिती करण्यास अधिक जोर लावावा लागतो. सोबतच अॅसिडिटी व पचनसंस्थेच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. यामुळेच जंक फूड नियमित खाणे टाळावे.
अशी घ्यावी काळजी
* स्वादुपिंदाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जेवणाची योग्य ती वेळ ठेवावी
* काही अडचण आल्यास योग्यवेळी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
* आरोग्य तज्ञांचा सल्ल्याशिवाय स्वत: कोणतेही औषध घेणे टाळावे.
* तसेच तज्ञांचा सल्ल्याशिवाय औषध उपचार बंद करू नये.
मद्यपानाचे सेवन टाळावे :
अतिमद्यपान केल्याने आरोग्यास धोका पोहोचू शकतो. अतिसेवणामुळे रक्तातील 'सिराम अमायलेज' याचे प्रमाण तसेच युरीनमधील अमायलेज याचे प्रामान वाढते. शरीरात पित्तखडे झाल्यास तुम्हाला सी.टी. स्कॅनिंग करावी लागते. तसेच शस्त्रक्रिया करणे हा त्यावरचा योग्य उपाय ठरू शकत नाही. माड्यापानामुळे स्वादुपीडाचे आरोग्य घरब होऊ शकते. यामुळेच मद्यपान करणे टाळणे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.