Good Sleep Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Research: पुरेशी झोप न घेतल्यास होतील 'हे' गंभीर आजार; कोणत्या वयात किती झोप घ्यावी? घ्या जाणून...

Puja Bonkile

Sleep: निरोगी आरोग्यासाठी जसे पोषक आहार घेणे गरजेचे असते तसेच पुरेशी झोप घेणे देखील गरजेचे आहे. कारण अपुरी झोप अनेक शारिरिक समस्या निर्माण करू शकते. जनर्ल ऑफ प्रोटीओ रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात रिसर्चनुसार अपुरी झोप घेतल्यास मेंदुला पुरवठा करणाऱ्या प्रोटीनची कमतरता जाणवते. यामुळे अनेक शारिरिक आजार उद्भवू शकतात.

संशोधनात आली माहिती समोर

चिनी संशोधकांनी उंदरांवर संशोधन केले आहे. जेव्हा उंदरांना अनेक दिवस झोपू दिले जात नव्हते, तेव्हा त्यांच्या मेंदूतील प्रोटेक्टिव्ह प्रोटीन प्लीओट्रोफिनचे प्रमाण कमी होते. यामुळे समजण्याची क्षमता कमी होणे, लक्षात न राहणे,स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

केईएम हॉस्पिटलच्या डीन आणि न्यूरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता रावत म्हणतात की, जर एखाद्याला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याच्या मेंदुलाही आराम मिळत नाही. मेंदूतील ग्लिम्फॅटिक सिस्टम झोपल्यानंतरच सेंट्रल नर्वस सिस्टम टॉक्सिन बाहेर काढण्याचे काम करते. जर एखादी व्यक्ती रात्रीची पुरेशी झोप घेत नसेल तो आपल्या कामावर लक्ष केद्रिंत करू शकत नाही. तसेच दिवसभर त्याला अस्वस्थ वाटते.

सध्याची तरूणपिढी रात्रभर जागून सोशल मिडियाचा वपार करतात. यामुळे त्यांच्या शाळेतील आणि कॉलेजमधील अभ्यासावर विपरित परिणाम होतो. परिक्षेच्या काळात रात्रभर जागुन अभ्यास करून देखील परिक्षेच्या वेळी काहीही आठवत नाही. यामुळे झोपेशी तडजोड करू नका.

पण अनेकवेळा लोक रात्री जागरण करून दिवसा झोप घेतात. पण झोप पूर्ण होत नाही.
डॉ. सागर मुंदडा मानसोपचार तज्ज्ञ
  • काय म्हणतात मानसोपचार तज्ज्ञ

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंद्रा यांच्या मते पुरेशी झोप न झाल्याने व्यक्ती कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. तसेच मूड चांगला न राहणे, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण, चिडचिड होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. अपुरी झोप ही सवय झाली तर विसरण्याची समस्या सुरू होते. त्याला फॉगी मेमरी असेही म्हणतात. झोप अपुरी झाल्यास पचनसंस्थेसंबंधित देखील समस्या निर्माण होऊ शकतात.

  • वयानुसार किती तास झोप घ्यावी

3 महिन्यापेक्षा कमी असलेल्या मुलांनी 14 ते 17 तास झोपावे.

4 ते 12 महिन्याच्या मुलांनी 12 ते 16 तास झोपावे.

1 ते 5 वर्षाच्या मुलांनी 10 ते 14 तास झोप घेणे गरजेचे आहे

6 ते 12 वर्षाच्या मुलांनी 9 ते 12 तास झोप घ्यावी.

13 ते 18 वर्षाच्या मुलांनी 8 ते 10 तासाची झोप घ्यावी

18 वर्षाच्यावरील सर्व लोकांनी 7 ते 9 तासाची झोप घेणे गरजेचे असते.

  • पुरेशी झोप घेण्याचे फायदे

पुरेशी झोप घेतल्याने शरीर आणि मेंदुला आराम मिळतो. तसेच शरीराची इम्युनिटी वाढण्यास मदत मिळते. हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT