New Year 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

New Year 2024: नव वर्षात स्वत:ला 'असे' ठेवा फिट अन् हेल्दी

Puja Bonkile

New Year 2024: नव्या वर्षाच्या स्वागताला आता फक्त एकाच दिवसाचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येकासाठी नव वर्ष आशेचा किरण घेऊन येतो. अनेक लोक आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी नव वर्षात अनेक संकल्प करतात. जर तुम्हाला येत्या वर्षात फिट आणि हेल्दी राहायचे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.

वेळेवर झोपणे

जर तुम्हाला येत्या वर्षात फिट आणि हेल्दी राहायचे असेल तर वेळेवर झोपण्याची सवय लावावी. यासाठी रात्री वेळेवर झोपावे. यामुळे कोणतीही आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होणार नाही.

स्ट्रेस न घेणे

स्ट्रेस घेतल्याने मानसिक आणि शरिरीक आरोग्यावर परिणाम होतो. स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन करावे.

व्यायाम करणे

जर तुम्हाला येत्या वर्षात फिट आणि हेल्दी राहायचे असेल व्यायाम करावा. सकाळी नियितपणे व्यायाम करावा. यामुळे कोणतेही आजार जवळ येणार नाही.

पौष्टिक आहार

पौष्टिक आहार घेणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे नव वर्षात फळ, पालेभाज्या, कडधान्यांचा आहारात समावेश करावा.

हेल्थ चेकअप

नव वर्षात निरोगी राहण्यासाठी नियमितपणे हेल्थ चेकअप करावे. यामुळे कोणताही आजार झाल्यास त्यावर उपचार करता येतील.

व्यसनांपासून दूर राहा

मद्यपान किंवा धूम्रपान यासारखे व्यसन असेल तर यापासून मुक्ती मिळवा. कारण यामुळे हृदयासंबंधित अनेक आजार निर्माण होऊ शकतात.

स्वच्छता राखा

निरोगी राहण्यासाठी वैयक्तिक आणि शरीराची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यामुळे अनेक आजार दूर राहतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

Subhash Velingkar: 'वेलिंकरांना अटक करा, नाहीतर...'; संतप्त जमावाचा सरकारला अल्टिमेटम; डिचोलीत गुन्हा दाखल!

Delhi Drug Case: मोठा खुलासा! गोव्यामार्गे दिल्लीत पोहोचले ड्रग्ज; साडेपाच हजार कोटींच्या 562 किलो कोकेन‌ची तस्करी

SCROLL FOR NEXT