Neem Face Pack Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Neem Face Pack: चेहऱ्यांवरील मुरूमावर उपयुक्त

कडुलिंबाचे फेस पॅक चेहऱ्यांवरील मुरूम, काळे डाग दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

दैनिक गोमन्तक

कडूलिंब ही एक नैसर्गिक वनस्पती आहे. भारतात अनेक शतकांपासून कडूलिंबाचा वापर विविध उपचार आणि सौंदर्य उत्पादनासाठी केला जात आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे त्वचेवरील काळे डाग, सुरकुत्या आणि पूरळ कमी होतात. तसेच निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी (Skin) तुमची कडुलिंब फेस पॅकचा वापर करू शकता.

* कडूलिंब तुळशीची पाने, मध आणि मुलतानी मातीचा फेस पॅक

6-7 कडूलिंबाची पाने आणि तुळशीची 6 पाने घ्यावी. तुळस आणि कडुलिंबाची पाने बारीक करून घ्यावी. नंतर मिश्रणात 1 चमचा मध टाकावे. भांड्यात अर्धा कप मुलतानी माती टाका. सर्व साहित्य मिक्स करून पेस्ट बनवावी. पेस्टमध्ये हवे तसे पाणी टाकावे. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लाऊन ठेवावे. असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा केल्यास चेहऱ्यांवरील डाग कमी होण्यास मदत मिळेल.

* कडूलिंब, दलिया, दूध आणि मध

हे फेस पॅक तयार करण्यासाठी अर्धा कप दलिया घ्यावा. 1 चमचा दूधमध्ये एक चमचा मध मिक्स करावे. नंतर त्यात 2 चमचे कडुलिंबाची पेस्ट मिक्स करावी. तुम्ही वाळवलेल्या कडुलिंबाच्या पानाची पावडर तयार करून ठेवू शकता. हे सर्व साहित्य चांगले मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावर लावावे. 3 ते 4 मिनिटे हलक्या हाताने मसाज करावी. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा (Face) धुवावा. हे फेसपॅक (Face Pack) तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावू शकता.

* कडूलिंब आणि काकडीचा फेस पॅक

एका भांड्यात 7 ते 8 कडूलिंबाची पाने घ्यावी. ती चांगल बारीक करावी. त्यात अर्धा वाटी काकडीचा खिस टाकावा. एक चमचा बदाम तेल घालून चांगल मिक्स करावे. हे पॅक चेहऱ्यावर 20 ते 15 मिनिटे ठेवावे. नंतर थंड पाण्याने धुवावे. असे आठवड्यातून दोनदा करावे. यामुळे चेहरा निरोगी राहून मुरूम कमी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

Avatar 3 Trailer Launch: नव्या विलेनची एन्ट्री... 2100 कोटींच्या 'अवतार 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT