Navratri Festival 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri 2023: माता दुर्गेच्या 'या' प्रसिद्ध मंदिरांना द्या भेट

नवरात्रीनिमित्त देशभरातील माता दुर्गेच्या या मंदिरांना द्या भेट

Puja Bonkile

Navratri 2023: नवरात्र हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गादेवीचे भक्त नऊ दिवस उपवास करतात आणि मनोभावे पूजा करतात. तसेच, या काळात भक्त माता दुर्गा मंदिरांनाही भेट देतात. या नवरात्रीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भारतातील दुर्गेच्या काही खास मंदिरांबद्दल सांगणार आहोत. या मंदिरांची स्वतःची एक खास श्रद्धा आहे आणि या मंदिरात गेल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

वैष्णो देवी मंदिर

हे भारतातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक आहे. जिथे जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. जम्मू-काश्मीरच्या कटरा जिल्ह्यात असलेल्या या मंदिरात वर्षभर भाविकांची अलोट गर्दी असते. असे मानले जाते की देवी दुर्गा येथे खडकांच्या रूपात गुहेत निवास करते. हे मंदिर कटरा पासून 13 किलोमीटर वर आहे.

त्रिपुरा सुंदरी मंदिर, त्रिपुरा

हिंदू पौराणिक कथेनुसार सतीचा उजवा पाय ज्या ठिकाणी पडला होता, त्या ठिकाणी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यातील उदयपूर शहरात वसलेले आहे. या मंदिरात काली मातेची सोरोशी रूपात पूजा केली जाते.

मंगळा गौरी मंदिर, बिहार

प्रचलित मान्यतेनुसार देवी सतीचे स्तन ज्या ठिकाणी पडले होते तेथे आज मंदिर आहे. हे मंदिर गया येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे आणि नवरात्रोत्सवादरम्यान येथे भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.

दंतेश्वरी मंदिर, छत्तीसगड

दंतेवाडाचे प्रसिद्ध दंतेश्वरी मंदिर छत्तीसगडच्या बस्तर भागात आहे. सुंदर खोऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर खूप जुने आहे. असे मानले जाते की येथे सतीचा दात पडला होता, त्यामुळे या स्थानाचे नाव दंतेश्वरी पडले आहे.

दुर्गा मंदिर, वाराणसी

हे मंदिर रामनगरमध्ये वसलेले आहे. असे मानले जाते की हे मंदिर 18 व्या शतकात बंगाली राणीने बांधले होते. हे मंदिर भारतीय स्थापत्यकलेतील उत्तर भारतीय शैलीतील नागरा शैलीत बांधले आहे. या मंदिरात चौकोनी आकाराचे तळे असून ते दुर्गा कुंड म्हणून ओळखले जाते. या इमारतीला गेरूच्या अर्काने लाल रंग दिला आहे. मंदिरातील देवीची वस्त्रेही गेरू रंगाची आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, या मंदिरात स्थापित केलेली मूर्ती माणसाने बनवली नसून ही मूर्ती स्वतः प्रकट झाली होती, जी लोकांचे वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी आली होती. नवरात्री आणि इतर सणांमध्ये हजारो भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात.

श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

श्री महालक्ष्मी मंदिर हे विविध शक्तीपीठांपैकी एक आहे. ते कोल्हापूर येथे आहे. येथे प्रत्येक भक्त आपल्या मनोकामना पुर्ण करण्यासाठी येतो, आईच्या आशीर्वादाने ती इच्छा पूर्ण होते. भगवान विष्णूची पत्नी असल्याने या मंदिराला माता महालक्ष्मी असे नाव पडले.

नैना देवी मंदिर, नैनिताल

नैनीतालमधील नैनी तलावाच्या उत्तरेकडील किनारी नैना देवी मंदिर आहे. 1880 मध्ये भूस्खलनाने हे मंदिर उद्ध्वस्त झाले. नंतर त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. येथे सतीच्या शक्तीरूपाची पूजा केली जाते. मंदिरात दोन डोळे आहेत, जे नैना देवीचे प्रतिनिधित्व करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT