माँ दुर्गेला रोज नवा नैवेद्य  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Restaurant in Goa: नैवेद्याची खिचडी...

अष्टमी दिवशीच्या भोगचं जेवण फारचं चविष्ट असतं. भोगमध्ये मिळणारी खिचडी (Khichdi) निव्वळ अप्रतिम. तशी खिचडी बनवण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण तशी चव कधीच आली नाही.

Manaswini Prabhune-Nayak

गेली अनेक वर्ष पणजीत (Panaji) गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहात दुर्गापूजा साजरी केली जाते. तिथलं वातावरण अगदी बंगालीमय बनून जातं. पाच दिवस इथे माँ दुर्गेला रोज नवा नैवेद्य दाखवला जातो. त्यासाठी खास बंगालवरून आचारी बोलावले जातात. सकाळपासून भाजी चिरणं सुरु असतं. काही जिन्नस, जे इथे गोव्यात (Goa) मिळत नाही ते खास कोलकातावरून (Kolkata) मागवले जातात.

नवरात्रीचे नऊ रंगांचे रंगीबेरंगी दिवस सध्या सुरु आहेत. अनेकजणांचे  उपास  सुरु असणार, घराघरात मनोभावे देवीची पूजा होत असणार. घराघरात नैवेद्य बनवला जात असेल. आता अशाप्रकारचे  सण -उत्सव रेस्टाॅरंट - हॉटेलवाले देखील साजरे करू लागले आहेत. यानिमित्ताने त्यांच्या मेनूकार्डमध्ये  बदल होऊ लागलाय. नवरात्रीची धूमधाम बंगाल आणि गुजरात इतकी गोव्यात दिसत नाही. त्यामुळे इथल्या हॉटेल - रेस्टाॅरंटमध्ये देखील तसा फारसा बदल दिसत नाही. काही वर्षांपूर्वी पणजीतल्या फिदाल्गो  हॉटेलच्या रेस्टाॅरंटमध्ये  नवरात्रीच्या काळात नऊ दिवस रोज वेगवेगळे नऊ पदार्थ मेनूकार्डवर  नव्याने घातले जायचे. तिथल्या शेफने हे अतिशय कल्पकतेने तयार केले होते. उपासाची  कचोरी, उपासाचे  थालीपीठ, वेगवेगळ्या प्रकारच्या खीर, उपासाची भजी, पराठे असे असंख्य प्रकार होते. रोज एक नवा पदार्थ खाल्ला तरी पदार्थांची यादी संपत नव्हती. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर हॉटेल बरेच महिने बंद होतं. रेस्टाॅरंटचं  व्यवस्थापन देखील बदललं आहे. पण पणजीत हे  एकमेव रेस्टाॅरंट होतं ज्यांनी नवरात्रीच्या काळात खवय्यांना रोज नवे पदार्थ खायला घातले. यात एक वेगळा भाग असा होता की हे नवे पदार्थ चवीला कसे वाटले? हे मुद्दाम  त्यांचा  शेफ किचनमधून येऊन लोकांना विचारायचा. लोकांची प्रतिक्रिया ऐकायचा. कोणी वयस्कर महिला असेल तर तिला तिची खास रेसिपी विचारायचा. हे सगळं तिथे येणाऱ्याला  सुखावून जायचं. पण आता हे चित्र दुर्मिळ झालं आहे. 

गोव्यात पणजी, मडगाव, वास्को या शहरात अनेक बंगाली लोक आहेत. त्यामुळे या शहरात सामूहिक दुर्गापूजा होते. दुर्गापूजा हा अनुभवण्याचाच प्रकार आहे. पाच दिवस चालणारा हा सोहळा एकदा तुम्ही अनुभवला की पुढच्या वर्षी आपोआप तुमचे पाय दुर्गापूजेच्या मंडपाकडे वळतील. बंगाली माणसांबद्दल मला कायम एक गूढ वाटायचं. मंडळी सगळी कट्टर कम्युनिस्ट, थोडी नास्तिक. पण दुर्गापूजा ही त्यांची अतिशय जिव्हाळ्याची. अगदी नास्तिकातला नास्तिक दुर्गापूजेला छान घडी न मोडलेलं धोतर नेसून दुर्गेला अंजली (अभिषेक) देणार. भांगभर लालचुटुक सिंदूर, पायाच्या तळव्यांना लावलेला अल्ता (लाल रंग), शंखाच्या बांगड्या आणि सुंदर सुंदर साड्या नेसलेल्या बंगाली बायकांची लगबग, त्यांचे लाडिक - मधाळ बंगाली बोली अतिशय गोड वाटते. ही सगळी मंडळी दुर्गापूजाकडे धार्मिकतेच्या नजरेतून बघत नाहीत. दूर्गापूजा थेट बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाते. तोंडात रोशगुल्ला ठेवल्यासारखे गोडगोड बंगाली भाषेत बोलणारे आजूबाजूला असणं छान वाटतं. बंगाली लोकांमध्ये नऊ दिवस नाहीतर पाच दिवस पूजा असते आणि त्यात देखील अष्टमीची पूजा अधिक महत्वाची. अष्टमी दिवशीच्या भोगचं जेवण फारचं चविष्ट असतं. भोगमध्ये मिळणारी खिचडी निव्वळ अप्रतिम. तशी खिचडी बनवण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण तशी चव कधीच आली नाही. फक्त त्या खिचडीसाठी दूर्गापूजेला मी जायची.

इथल्या कुठल्याच रेस्टारंटमध्ये मिळणार अशी खिचडी या दिवसात दुर्गापूजा होते, त्या मंडपात मिळते. गेली अनेक वर्ष पणजीत गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहात दुर्गापूजा साजरी केली जाते. तिथलं वातावरण अगदी बंगालीमय बनून जातं. अगदी मधाळ बंगाली बोल कानावर पडत असतात. त्यामुळे काही काळासाठी आपण बंगालमध्ये आहोत की काय, असं वाटायला लागतं. पाच दिवस इथे माँ दुर्गेला रोज नवा नैवेद्य दाखवला जातो. त्यासाठी खास बंगालवरून आचारी बोलावले जातात. सकाळपासून भाजी चिरणं सुरु असतं. काही जिन्नस, जे इथे गोव्यात मिळत नाही ते खास कोलकातावरून मागवले जातात. खजुराचा गूळ हा त्यातलाच प्रकार. विशेषतः पायससाठी या गुळाचा वापर करतात. या गुळाची चव वेगळीच असते आणि म्हणूनच प्रसादाची खीर देखील खूप वेगळी लागते. नैवेद्यात फक्त खिचडी आणि खीर एवढेच पदार्थ नसतात. मोजता येणार नाही इतक्या पदार्थांची रेलचेल असते. या सगळ्यात जास्त भाव खाऊन जाणारा पदार्थ म्हणजे रसगुल्ला. रसगुल्ला ही बंगाली लोकांची ओळख सांगावी, असा पदार्थ. खास कोलकाता येथूवन आणलेल्या आचाऱ्यांनी बनवलेला अतिशय स्पॉंजी रसगुल्ला इथेच खायला मिळतो. भोग दिला जाणाऱ्या सगळ्या पदार्थांची नावं उच्चारणं आणि त्यांना लक्षात ठेवणं हे महाकठीण. लक्षात राहतात, ती खिचडी - खीर आणि रसगुल्ला. आरतीनंतर मिळणारा प्रसाद त्या मंडपात बसून खाताना खूपच चविष्ट लागतो. असा प्रसाद एरवी घरी बनवून खा, त्यात एवढी मजा येत नाही. प्रसन्न वातावरण, प्रसन्न चेहरे आणि समोर माँ दुर्गेची तेजस्वी मूर्ती या साऱ्याचा आपोआप प्रभाव पडतो. दुर्गापूजेतली नैवेद्याची खिचडी हा अतिशय साधा प्रकार आहे. तांदूळ - मूग डाळ आणि काही भाज्या ज्यात वाल, बटाटा, फ्लॉवर घालून ही खिचडी करतात. शुद्ध तुपात केल्या जाणाऱ्या या खिचडीत तुपाची फोडणी करतात पण हळद त्या फोडणीत घालत नाही. खिचडी शिजत असताना वरून हळद पावडर घातली जाते त्यामुळे हळदी पावडरची एक वेगळी चव खिचडीला येते. आरती करून झाल्यावर दुर्गामातेच्या मूर्तीसमोर बसून प्रसादाची गरम गरम खिचडी आणि तांदळाची खीर खाण्यात एक वेगळी मजा असते. अशी संगती फक्त दुर्गापूजेतच मिळते. त्या मंडपात खिचडी आणि खीरीचा मिश्र सुवास दरवळत असतो. गेल्या वर्षी पणजीत दुर्गापूजा झाली नाही. खूप चुकल्या चुकल्या सारखं वाटलं. यावर्षी पणजीत बंगाली कल्चर असोसिएशन अतिशय साधेपणाने दुर्गापूजा साजरी करणार आहेत. गेल्यावर्षी दुर्गेचा नैवैद्य खायला मिळाला नव्हता, यावर्षी तो मिळणार याचाच मोठा आनंद झालाय.

आपलं गाव, आपला प्रदेश, आपली संस्कृती यापासून कोसो मैल दूर असणारा समुदाय आपली ओळख - आपले अस्तिव अशा प्रकारच्या उत्सवांमधून जीवित ठेवत असतो. त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची यानिमित्ताने आपल्याला संधी मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT