Morning Tips: अनेक लोकांची सकाळ ही चहा आणि कॉफीने होते. तुम्ही सकाळी सर्वात आधी काय खाता याने काही फरक पडतो का? तुम्ही आरोग्य तज्ञांना किंवा आहार तज्ञांना विचाराल तर ते म्हणतील हो असे उत्तर देतील. त्यांच्या मते, दिवसाची सुरुवात ही पौष्टीक पदार्थांनी केली पाहिजे. संशोधन असेही सूचित करते की नाश्ता चरबी आणि प्रथिनांनी भरलेला असावा. जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात.
बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहा (Tea) किंवा कॉफीने (Coffee) करतात. आरोग्य तज्ञांच्या मते दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करू नये, तर केळी, भिजवलेले बदाम किंवा मनुका याने करावी. चला तर मग जाणून घेऊया याचे शरीराला काय फायदे होतात.
जर तुम्हाला अपचन, गॅस, किंवा एनर्जीची कमतरता असा त्रास होत असेल आणि खाल्ल्यानंतर गोड खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही दिवसाची सुरुवात केळीने करावी. जर तुम्हाला केळी आवडत नसेल तर तुम्ही कोणतेही हंगामी फळ खाऊ शकता.
केळी खाल्याने ज्या लोकांना पचनाच्या समस्या किंवा गोडाची आवड आहे त्यांनी सकाळी प्रथम केळी खावी.
सकाळी 6 ते 7 भिजवलेले मनुके खाउ शकता. जर पीएमएस तुम्हाला त्रास देत असेल तर केशर घालून 10 दिवस सेवन करु शकता. काळे मनुके खाने फायदेशीर असते. भिजवलेले मनुके हिमोग्लोबिन, गॅस, मूड स्विंग किंवा पीसीओडीची समस्या दूर करतात.
सकाळी भिजवलेले बदाम खाणे आरोग्यदायी असते. 4-5 भिजवलेले बदाम सोलून खावे. जर तुम्हाला मधुमेह, अपुरी झोप, पीसीओडी इत्यादींचा त्रास होत असेल तर तुम्हाला याचा फायदा मिळेल.
दिवसाची सुरुवात या तीनपैकी एका गोष्टीने करा आणि त्यानंतर 10-15 मिनिटांनी तुम्ही चहा किंवा कॉफी पिऊ शकता.
वर नमूद केलेल्या गोष्टी खाण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे.
उठल्यानंतर किंवा थायरॉईडचे औषध घेतल्यानंतर 20 मिनिटांत या गोष्टी खावे.
जर तुम्ही सकाळी वर्कआउट किंवा योगा (Yoga) करत असाल तर जेवल्यानंतर 15-20 मिनिटांनी करा.
जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर ते खाल्ल्यानंतर एक तासानंतर नाश्ता करा.
मनुका ज्या पाण्यात भिजवलेले असते ते पाणी देखील आरोग्यदायी असते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.