Tips for Glowing Skin Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tips for Glowing Skin: ग्लोइंग स्किन हवीय? मग सकाळच्या 'या' सवयी टाळा

Puja Bonkile

Morning Tips for Glowing Skin: निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी महिला अनेक उपाय करत असतात. मार्केटमध्ये उपलब्ध असलेले प्रोडक्ट वापरतात.

इतकेच नाही तर नियमित स्किन केअर रूटीनचे पालन करतो, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या हळूहळू आपल्या त्वचेची चमक काढून टाकून आपल्या त्वचेला हानी पोहोचवत असतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत हे जाणू घेऊया.

यापैकी बर्‍याच गोष्टी अशा आहेत, ज्या आपण रोज करतो, परंतु त्याबद्दल माहिती नसते आणि कोणताही त्वचा निगा तज्ज्ञ आपल्याला या गोष्टी सांगत नाही.

जर तुम्ही त्वचेची निगा राखण्यासाठी भरपूर प्रोडक्ट लावत असाल आणि त्यामुळे तुमच्या त्वचेला फायदा होत नसेल, तर तुम्ही पुढिल गोष्टी फॉलो करू शकता.

ओट्स

ब्रेकफास्टसाठी एक वाटी ओट्स खाणे आरोग्यदायी असते. पण दररोज असे शरीरासाठी आणि त्वचेसाठी घातक ठरू शकते.

जेव्हा तुम्ही ओट्सचे अतिसेवन करता, तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला इतर आवश्यक पोषक तत्वांपासून दूर ठेवता. ज्यामुळे कुपोषणचे प्रमाण वाढू शकते. तसेच तुमची त्वचा कोरडी आणि चिकट होऊ शकते.

जास्त वेळ आंघोळ

हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करायला कोणाला आवडत नाही ? परंतु दररोज विनाकारण गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचसाठी हानिकारक ठरू शकते.

गरम पाणी त्वचेचा ओलावा काढून टाकते. ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते. बरेच लोक गरम पाण्याने चेहरा धुतात. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या झपाट्याने वाढतात.

कॉफी पिणे

अनेक लोकांची सकाळ एक कप गरम कॉफीशिवाय सुरू होत नाही. पण जर तुम्ही रोज ब्रेकफास्टपूर्वी कॉफी प्यायले तर तुमच्या त्वचेला फायदा होण्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.

कॉफीचे अतिसेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात.

सनस्क्रीन

उन्हाळ्यात तुम्ही घराबाहेर असता तेव्हा सनस्क्रीन तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यात मदत करते. परंतु तुम्ही संपूर्ण दिवस घरात असाल तरीही सनस्क्रीन लावल्याने त्वचेचे वृद्धत्व टाळता येते. 

त्यामुळे, तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये काम करत असलात किंवा बाहेर कामासाठी जात असाल तरीही, तुमची त्वचा अधिक काळ तरुण ठेवण्यासाठी सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे.

एकच स्किन केअर रूटीन

एकच प्रोडक्ट चेहऱ्यावर रोज वापरल्याने तुमच्या त्वचेला काहीही फायदा होणार नाही. तुमची त्वचा चमकदार दिसण्यासाठी आणि निरोगी दिसण्यासाठी ऋतूंनुसार तुमच्या त्वचेची काळजी घ्यावी.

चुकीचा फेसवॉश वापरणे

सकाळी उठल्यानंतर जर तुमची त्वचा तेलकट दिसत असेल, तर कठोर फॉर्म्युला असलेले क्लिंझर वापरू नका. सौम्य क्लिंझर वापरून कोमट पाण्याने चेहरा धुवावा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT