Morning Breakfast Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tomato Garlic Pasta Recipe: झटपट नाश्त्यासाठी तयार करा टेस्टी टोमॅटो गार्लिक पास्ता

पास्ता खायला लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते.

Puja Bonkile

Morning Breakfast Tomato Garlic Pasta Recipe: मुलांना कधीही म्हटलं तरी ते पास्ता खायला तयार असतात. फक्त नाश्त्यातच नाही तर ते डिनरमध्ये सुद्धा पास्ता आवडीने खातात. पास्ता खायचं म्हटलं की मुलं खूश होतात.

जर तुम्हाला मुलांसाठी घरी पास्ता बनवायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. या रेसिपीमध्ये फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेला पास्ता वापरला नाही तर टोमॅटो आणि लसूण टाकल्याने रेसिपी हेल्दी आणि टेस्टी होईल.

या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवडीनुसार काही गोष्टी अॅड किंवा स्किप करू शकता. चला तर जाणून घेऊ कसे बनवायचे टोमॅटो गार्लिक पास्ता.

  • टोमॅटो गार्लिक पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य

400 ग्राम व्होल व्हीट पास्ता

2 चमचे वर्जिन ऑलिव्ह ऑइल

2 मूठ परमेसन चीज

1 वाटी कोथिंबीर

काळी मिरी पूड गरजेनुसार

500 ग्रॅम चेरी टोमॅटो

8 तुळशीचे पानं

मीठ

पाणी

  • टोमॅटो गार्लिक पास्ता बनवण्याची कृती

पास्ता बनवण्यासाठी सर्वात पहिले व्होल व्हीट पास्ता उकळून घ्यावे.

चेरी टोमॅटो धुवून बारीक चिरून घ्यावी.

लसूण देखील बारीक कापून घ्या आणि परमेसन चीज किसून घ्या. हे सर्व साहित्य वेगवेगळ्या बाऊलमध्ये ठेवावे.

आता एक नॉन-स्टिक पॅन मध्यम आचेवर ठेवा आणि त्यात थोडे तेल गरम करा.

पॅनमध्ये चिरलेला चेरी टोमॅटो घाला आणि 4 ते 5 मिनिटे शिजवावे.

टोमॅटो शिजल्यानंतर त्यात बारीक केलेला लसूण टाका आणि मिक्स करा.

यासोबतच यात मीठ आणि काळी मिरी टाकावे.

यानंतर यात कोथिंबीर टाकून सर्व नीट मिक्स करून घ्यावे.

हे साधारण 10 मिनीट शिजू द्यावे.

टोमॅटो चांगले शिजून मॅश होईपर्यंत शिजवा.

आता शेवटी पहिलेच शिजवलेला पास्ता टाका आणि मिक्स करा. 

तुमचा टोमॅटो गार्लिक पास्ता रेडी आहे.

प्लेट मध्ये काढा आणि वरून चीज टाकून गरमा गरम सर्व्ह करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT