Moring Breakfast| Upma Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Moring Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा रव्याचा उपमा

सकाळच्या नाश्तात झटपट बनवा रव्याचा हा पदार्थ

दैनिक गोमन्तक

रोज सकाळी कोणता नाश्ता बनवायचा हा मोठा प्रश्न पडतो. विशेषतः जे लोक नोकरी करतात किंवा ज्यांना सकाळी लवकर काहीतरी बनवायचे असते. तुम्हालाही ही समस्या असेल तर तुम्ही सकाळी रव्याचा झटपट उपमा बनवू शकता.

खायला चविष्ट असणारी ही रेसिपी बनवायला देखील सोपी आहे. तसेच हे आरोग्यासाठीही चांगले आहे. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. जाणून घेउया रव्याचा उपमा कसा बनवतात.

  • रव्याचा उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- रवा - दोन वाट्या

- बारीक चिरलेला कांदा

- बारीक चिरलेला टोमॅटो

- बारीक चिरलेले गाजर

- बारीक चिरलेली कोथिंबीर

- बारीक चिरलेली हिरवी मिरची

- लाल मिरची

- शेंगदाणे

- मोहरी

- उडीद डाळ

- हरभरा डाळ

- जिरे

- कढीपत्ता

- तेल किंवा तूप

- मीठ

- पाणी

रव्याचा उपमा बनवण्याची पद्धत

रव्याचा उपमा बनवण्यासाठी सर्वात पहिले रवा खमंग भाजून घ्यावा. पॅनमध्ये मंद आचेवर रवा भाजल्यावर बाजूला काढून ठेवावा. आता पॅनमध्ये 2 चमचे तेल किंवा तूप टाकावे. आता त्यात मोहरी आणि जिरे घालून फोडणी करा. यानंतर उडीद डाळ घाला.

यानंतर त्यात अर्धा चमचा हरभरा डाळ घालून थोडे शिजवावे. यानंतर त्यात शेंगदाणे घाला. शेंगदाणे शिजायला लागल्यावर त्यात कढीपत्ता घालावा. यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गाजर घालून भाजून घ्या.

यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात वाटाणा घालु शकता. आता थोडे मीठ, लाल तिखट घाला. यानंतर सर्व काही व्यवस्थित मिक्स करा. आता दोन कपपेक्षा थोडे जास्त पाणी घालून उकळा.

तुम्ही यात वाटाणा टाकला असेल तर पाणी जास्त घ्यावे, नाहीतर अडीच कप पाणी पुरेसे आहे. लक्षात ठेवा की मोजण्यासाठी तोच कप घ्या ज्यातून रवा मोजला होता. आता त्यात हळूहळू रवा घाला आणि चमच्याने ढवळत राहा. आता सर्व काही चांगले मिक्स करा. रवा फुगलेला दिसेल. गॅसची आच बंद करून झाकून ठेवा. आता कोथिंबिरीने सजवा आणि गरमा गरम सर्व्ह करा.

टिप: रवा आधीच भाजून ठेवल्यास उपमा लवकर तयार होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT