Vegetable  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Kitchen Tips: पावसाळ्यात भाज्या लवकर खराब होतात? असे करा स्टोअर

पावसाळ्यात भाज्या जास्त वेळ टिकून राहण्यासाठी काही सिंपल टिप्स सांगणार आहोत.

Puja Bonkile

Monsoon Kitchen Tips: पावासाळ्यात भाज्यांचे भाव अधिक वाढतात. पावसाळ्यात भाज्या नीट साठवल्या नाहीत तर त्या लगेच खराब होतात. भाज्या ताज्या राहण्यासाठी वेळोवेळी त्यावर पाणी टाकले जाते. यामुळे भाज्या खराब होऊ शकतात. यामुळे दीर्घकाळ भाज्या साठवण्यासाठी काही टिप्स फॉलो करू शकता.

  • भाज्या चांगल्या धुवाव्या

पावसाळ्यात भाज्या चांगल्या धुतल्या पाहिजे. कारण पावसाळ्यात भाज्यांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची भीती असते. म्हणून ते साठवण्यापूर्वी कोमट पाण्यात एक झाकण व्हिनेगर टाकून त्यात भाज्या 10 मिनिटे बुडवून ठेवावे. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.

  • भाज्या नीट वाळवावी

भाज्या चांगल्या धुतल्यानंतर वाळवणे देखील खूप गरजेचे आहे. जर तुम्ही भाज्या कोरड्या केल्या नाहीत तर त्या लवकर सडण्याची शक्यता वाढते. पावसाळ्यात भाज्या धुतल्यानंतर टिश्यू पेपर किंवा कॉटनच्या कापडाने भाज्या पुसून घ्याव्या.

  • भाज्या नीट जागी ठेवाव्या

भाज्या चांगल्या धुऊन वाळवल्यानंतर थंड आणि हवेशीर जागी स्टोअर कराव्या. पावसाळ्यात भाज्या बंद जागेत ठेवणे टाळावे.

पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावे

  • पालेभाज्या

कोबी किंवा पालक हिरव्या पालेभाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत. कारण त्यात बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव आढळतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.निरोगी राहायचे असेल तर पावसाळ्यात पालेभाज्या खाणे टाळले पाहिजे.

  • तळलेले पदार्थ

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला अपचन आणि डायरियाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

  • दुग्धजन्य पदार्थ

दही खाणे चांगले असते. पण पावसाळ्यात दही, ताक यासारखे दुग्धजन्य पदार्थ रोजच्या रोज टाळावेत. कारण पावसाळ्यात अन्नपदार्थांमध्ये बॅक्टेरिया फार लवकर वाढतात आणि दह्यात आधीच बॅक्टेरिया असतात. जर तुम्ही हे रोज म्हणाल तर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

  • कोशिंबीर

कोशिंबीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी पावसाळ्यात कच्च्या भाज्या खाल्ल्याने आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. काही भाज्यांमध्ये बॅक्टेरिया असतात, जे कच्चे खाल्ल्यास संसर्गाचा धोका वाढतो. पावसाळ्यात फक्त शिजवलेले अन्नच खावे.

  • सीफूड

पावसाळ्यात सीफूडपासून दूर राहा कारण ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. पावसाळ्यात माशांचा प्रजनन हंगाम असून बाजारात उपलब्ध असलेले मासे ताजे नसतात. हे फ्रिज किंवा साठवणुक करुन ठेवलेले असतात. यामुळे याचे सेवन करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

  • जंक फूड

पावसाळ्यात जंक फूडपासूनही दूर राहिले पाहिजे. स्ट्रिट फूड खाल्यास मलेरियाचा धोका खूप वाढू शकतो. या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावते. म्हणून इडली,डोसा,जलेबी,दही वडा असे आंबवलेले पदार्थ खाणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT