Monsoon Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Health Tips: पावसाळा आलाय, आरोग्य सांभाळा! काय खावे, काय टाळावे? जाणून घ्या खास आरोग्य टिप्स

What to Eat in Monsoon: राज्यात गेल्या आठवड्याभरापासून कधी पाऊस, तर कधी ऊन असा प्रकार सुरू असल्याने असंतुलीत हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप येणे, अशा आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात गेल्या आठवड्याभरापासून कधी पाऊस, तर कधी ऊन असा प्रकार सुरू असल्याने असंतुलीत हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप येणे, अशा आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पावसाळ्याचा आनंद लुटताना आपले आरोग्य देखील सांभाळणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे जरूरीचे आहे. या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, जुलाब होणे, तीव्र ताप, भूक न लागणे, डोकेदुखी, आदी आजार प्रामुखाने होतात, त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते.

पावसाळ्यात काय करावे

पाणी उकळून प्या - पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे पाणी नेहमी उकळून आणि गाळून पिणे आवश्‍यक आहे.

घरचे ताजे अन्न खा- पावसाळ्यात बाहेरचे, उघड्यावरील किंवा शिळे अन्न खाणे टाळा. गरम आणि ताजे अन्न घेण्यावर अधिक भर द्यावा

परिसर स्वच्छ ठेवा - घराभोवती पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या. कुलर, कुंड्या, टायर यांमधील साचलेले पाणी वेळोवेळी उपसा. भांडी डब घालून ठेवा.

फळे-भाज्या धुऊनच वापरा - बाजारातून आणलेल्या भाज्या आणि फळे कोमट पाण्याने स्वच्छ धुऊनच वापरा.

डासांपासून संरक्षण - झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला आणि मॉस्किटो रिपेलेंट क्रीमचा वापर करा.

काय टाळावे?

पुराच्या किंवा साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा. अपरिहार्य असल्यास, पाय ताबडतोब स्वच्छ धुवून कोरडे करा अन्यथा हे आजाराला निमंत्रण ठरू शकते.

ताप किंवा सर्दी झाल्यास स्वतःच्या मनाने कोणतीही गोळी न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानुसारच औषधांचे सेवन करा.

रस्त्यावरील चाट, पाणीपुरी, कट केलेली फळे आणि कच्चा सॅलड खाणे पूर्णपणे टाळा.

आरोग्यदायी पावसाळ्यासाठी

हळदीचे दूध प्या - रात्री झोपताना हळद घातलेले दूध प्या, यामुळे संसर्गापासून बचाव होतो.

कशाय, काढा - खोकला आणि घशाच्या खवखवीवर उत्तम गुणकारी कशाय किंवा काढा घ्या.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबू, आवळा, संत्री यांचा आहारात समावेश करा.

पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये कीटक असण्याची शक्यता असते, त्यामुळे त्या चांगल्या उकळून किंवा शिजवून खा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT