Monsoon Health Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Health Care: पावसाळ्यात पाणी पितांना कोणती काळजी घ्यावी, वाचा सविस्तर

पावसाळ्यात अनेकांना पोटाच्या समस्या असतात यामुळे पाणी पितांना काळजी घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Monsoon Health Care: पावसाळा हा उन्हापासून दिलासा देणारा असतो. पण या दिवसांमध्ये अनेक आजार देखील डोकं वर काढतात. यामुळे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात अनेक वेळा पाणी गढूळ येते. यामळे पिण्याच्या पाण्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

आयुर्वेदात असे सांगितले आहे की, तुम्हाला जर का तुमचे आरोग्य निरोगी ठेवायचे असले तर पावसाळ्यात पोटभर पाणी पिणे गरजेचे आहे. पण पावसाळ्यात पाणी पितांना काळजी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • कोमट पाणी प्या

पावसाळ्यात अनेकांना पोटाच्या समस्या असतात. त्यामुळे दिवसभर कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच पाणी हे नेहमी जेवणानंतर पाणी प्यावे. जेवणापूर्वी किंवा जेवणादरम्यानच पाणी पिणे टाळावे. जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

  • स्वच्छ पाणी

पावसाळ्यात स्वच्छ पाणी पिण्यावर भर द्यावा. पिण्याचे पाणी स्वच्छ असले तरीही, तुमच्या पिण्याच्या पाण्यात नियमितपणे जिवन ड्रॉपचे दोन थेंब टाकुनच ते पाणी प्यावे.

  • तांब्याच्या भांडयातील पाणी पिणे

आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले असते. विशेषतः पावसाळ्यात तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावे. तांबे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणतात.

  • तुरटीचा वापर करावा

पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवणे चांगले असते. त्यामुळे पाण्यातील गाळ खाली बसतो अणि नंतर ते पाणी तुम्ही पिण्याकरता घेऊ शकतात.

  • पाणी गाळून घ्यावे

पावसाळ्यात नळाचे पाणी गाळून भरावे. पावसाळ्यात नळातून येणारे पाणी अनेक वेळा गढुळ येते. यामुळे गाळून किंवा कोमट करुनच पाण्याचे सेवन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT