पावसाळ्यात (Rainy Day) अनेक पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण या वातावरणात आपली पचनसंस्था (Digestive system) नाजुक होते. अशा परिस्थितीत जड पदार्थ (Food) खाल्यास ते पचायला कठीण जाते. तर दुसरीकडे आपण या वातावरणात आपल्या आहारात निष्काळजीपने किंवा काहीतरी चुकीचे खालल्यास अन्न विषबाधा (Food Poison) होऊ शकते. अन्नामध्ये विषबाधा करणारे बॅक्टेरिया (Bacteria) अन्नामध्ये खूप वेगाने वाढतात. तसेच अन्नाद्वारे आपल्या शरीरामध्ये समावेश करतात. यामुळे पोटाचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण होते. अन्न विषबाधाला (Food Poison) गॅस्ट्रोएन्टेरिटिस म्हणून देखील ओळखली जाते. अन्न विषबाधेमुळे अनेकांना उलट्या, अतिसार, ओतीपोटी दुखणे आणि ताप यासारख्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसांत (Rainy Day) आपल्या आहाराची (Diet) काळजी घ्यायला हवी. जाणून घेऊया कोणते विषाणू (Virus) आणि कोणत्या प्रकारच्या आहारात (Diet) वाढतात ते जाणून घेऊया.
* साल्मोनेला
साल्मोनेला हा जिवाणूचा एक गट आहे. हा विषाणू अर्धवट शिजलेल्या पदार्थांमध्ये वाढतो. म्हणूनच अन्न चांगल्या प्रकारे शिजवून घ्यावे. तसेच खरबूज, टरबूज आणि अंकुर अशा काही प्रकारच्या फळामध्ये हा बॅक्टेरिया वाढू शकतो. परंतु असे पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच विषबाधा होण्याची लक्षणे दिसत नाही. याची लक्षणे दिसण्यासाठी किमान एक ते तीन दिवस लागू शकतात.
* क्लोस्ट्रिडियम परफ्रीगेन्स
हे जिवाणू अनेकदा मोठ्या प्रमाणात तयार केलेल्या पदार्थामध्ये आढळतात. विशेष म्हणजे कैटीन, कॅफेटेरिया, हॉस्पिटल किंवा केटरिड इव्हेंट्सचे भोजन घेतल्यानंतर आपल्याला या विषाणूमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळी आपल्याला ओटीपोटीमध्ये दुखणे किंवा पेटके आणि अतिसारसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
* नोरोव्हायरस
अन्न विषबाधामध्ये होण्याच्या कारणामागे हे एक कारण आहे. त्याला पोटाचा फ्लू देखील म्हणतात. नोरोव्हायरस दूषित पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. या संक्रमित लोकांशी संपर्क साधणे किंवा एखाद्या सामान्य ठिकाणी स्पर्श करणे ,जसे की दरवाजा, खिडकी इत्यादि ज्या व्यक्तीचा हा संसर्ग झाला असेल त्याचा परिणाम आपल्यावर देखील होऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत दूषित अन्न खाणे टाळावे. तसेच स्वच्छतेची काळजी घ्यावी. याची लक्षणे एक ते तीन दिवस टिकू शकतात.
* लिस्टेरिया
हे जिवाणी कमी तपमानात देखील वधू शकतात. म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांमध्ये सुद्धा सहज वाधु शकतात. हे जिवाणू फिश, चीज, आईस्क्रीम यासारख्या पदार्थांमध्ये आढळू शकते. त्याची लक्षणे 24 तासामध्ये दिसून येतात. यात उलट्या होणे, घाबरल्यासारखे होणे अशी लक्षणे दिसून येतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.