Monsoon Eye Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Eye Care: पावसाच्या पाण्यामुळे जळजळ होत असेल तर करा 'हे' उपाय

पावसाळ्यात कितीही काळजी घेतली तरी आपण भिजतो.यामुळे डोळ्यात जळजळ होत असेल तर घरगुती उपाय करून पाहावे.

Puja Bonkile

Monsoon Eyes Care: पावसाळा चांगलाच सुरू झाला आहे. काहीही झाले तरी आपण पावसात भिजतोच. या पावसाच्या पाण्यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात. पावसाच्या पाण्यामुळे डोळ्यात जळजळ तर होतेच पण त्या व्यक्तीला खाज येण्याची समस्या देखील होऊ शकते.

त्यामुळे व्यक्तीच्या दैनंदिन व्यवहारावरही परिणाम होऊ शकतो. अशावेळी काही घरगुती उपायांनी या समस्या दूर करता येतात.

  • बर्फाचे पॅक

डोळ्यांची खाज आणि जळजळ देखील कोल्ड कॉम्प्रेसद्वारे काढली जाऊ शकते. अशावेळी डोळ्यावर बर्फाचा पॅक ठेवावा. तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा तुमच्या डोळ्यावर बर्फाचे पॅक ठेवू शकता.

  • गुलाब जल

गुलाब जलच्या वापराने डोळ्यांची जळजळ आणि खाज सुटण्यापासून देखील आराम मिळतो. डोळ्यांवर गुलाब जलने कॉटन ओला करून ठेऊ शकता.

  • बटाटाचा वापर

पावसाच्या पाण्यामुळे होणारी जळजळ आणि खाज दूर करण्यासाठीही बटाट्याचे तुकडे खूप उपयुक्त ठरतात. बटाट्याच्या तुकड्यांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. जे सूज दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. अशावेळी बटाट्याचे छोटे गोल तुकडे करून डोळ्यांवर ठेवावे. हे तुकडे डोळ्यांवर किमान 5 ते 10 मिनिटे ठेवावे, असे केल्याने आराम मिळेल.

  • आय मास्क

बाजारात मिळणार आय मास्क देखील वापरू शकता. यामुळे डोळ्यावरची सुज आणि होणारी जळजळ कमी होते.

  • काकडीचे पाणी

डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी काकडीचे तुकडे फायदेशीर आहे. अशावेळी काकडी गोल आकारात कापून डोळ्यांवर ठेवावी. नंतर 5 ते 10 मिनिटांनी सामान्य पाण्याने डोळे धुवावे. असे केल्याने जळजळ आणि खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT