Monsoon Evening Snacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Evening Snacks: 'या' 6 प्रकारची भजी पावसाळ्यात पुरवतील तुमच्या जिभेचे चोचले

पावसाळ्यात अनेक लोकांना गरमागरम भजी आणि चहा प्यायला आवडते.

Puja Bonkile

Monsoon Evening Snacks: पावसाळा सुरू झाला की लोकांना चहा आणि भजी खायला आवडते. पावसाळ्यात वाफाळलेला चहा आणि गरमागरम, कुरकुरीत भजी दिसली कि तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही.

अनेकजण पावासाळ्यातल्या स्वर्गसुखाचा आनंद घेण्यासाठी चहा आणि त्यासोबत अनेक प्रकारची भजी खातात. पावसाळ्यात बनवायला अतिशय सोपे आणि खायला अतिशय चविष्ट असल्याने पावसाळा अविस्मरणीय बनतो.

कांदा भजी
  • कांदा भजी

पाऊस आला की अनेक लोकांना कांदा भजी आठवतात. कमीत कमी वेळात चांगलं आणि चविष्ट पदार्थ खाऊन भूक भागवण्यासाठी कांदा भजी हे एक उत्तम पर्याय आहे. कांदा भजी खाल्ल्याने शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

पालक भजी
  • पालक भजी

पावसाळ्यात सर्वात जास्त प्रमाणात पालक भजी खाल्ली जातात. संध्याकाळी चहासह या भज्यांचा आस्वाद घेतल्यास मन तृप्त होते. हिरवी मिरची आणि पालक हे दोन्ही घटक शरीरासाठी आरोग्यदायी आहेत. त्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होते व शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राहते.

मेथी भजी
  • मेथी भजी

हिरवी मेथी किंवा मेथीच्या पानांचा सुगंध हा अनेकांना आवडतो. बेसन पीठात मिसळून तयार केलेल्या मेथीच्या पानांच्या भजी पावसाळ्यात अनेक लोक आस्वाद घेतात. चहासह या भजींची मज्जा अधिक द्विगुणित होते.

घोसाळ्या भजी
  • घोसाळ्या भजी

अनेक लोक पावसाळ्यात मोठ्या आवडीने घोसाळ्याची भजी खातात. घोसाळी खाल्ल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत मिळते. घोसाळ्याचे गोल तुकडे करावे. नंतर बेसणमध्ये तिखट,हळद,मीठ, ओवा टाकुन घोसाळ्याचे गोल तुकडे टाकावे आणि तळावे. ही भजी तुम्ही चहासोबत किंवा टोमॅटो सॉससह खाऊ शकता.

मुग भजी
  • मुग भजी

मुगाची डाळ ही आरोग्यासाठी फायदेशीर असते. ही डाळ पचायला हलकी असते. मुगाच्या डाळीचे भजी बनण्यासाठी मुगाच्या डाळीची पेस्ट करून त्यात तिखट,हळद, ओवा मिक्स करुन बनवले जातात. या भजींचा आस्वाद हिरवी चटणी किंवा चहासोबत घेऊ शकता.

बटाटा भजी
  • बटाटा भजी

आलू भजी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पावसाळ्यात गरमागरम आलू भजी खायला कोणाला आवडत नाही...? बटाटा कोलेस्टॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायड्रेट्स आढळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT