Monsoon Eating Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Eating Tips: पावसाळ्यात किती अन् कसा असावा आहार, एक्सपर्ट्स काय सांगतात

पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी कोणता आणि किती आहार घ्यावा याकडे लक्ष देणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Simple Tips For Eating Right in the Monsoon Season: पावसाळ्यात कोणता आणि किती आहार घ्यावा याकडे लक्ष दिले पाहिजे. काही लोक पावसाळ्यात भाज्या न काण्याचा सल्ला देतात.तर कधी पावसामुळे कंदमुळ न खाण्याचा सल्ला देतात. पण पावसाळ्यात कोणता आहार घ्यावा कोणता नाही हे तज्ञांकडूनच जाणून घेऊया. कारण पावसाळ्यात आतडे नाजुक होतात यामुळे कोणतेही पदार्थ खाल्यास लगेच पोटाचे आजार उद्भवू शकतात.

  • आठवड्यातून 2 ते 3 वेळा कोणता आहार घ्यावा?

तज्ञांच्या मते, पावसाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा उकडलेले शेंगदाणे खाणे गरजेचे आहे. तसेच मोड आलेले कडधान्यांचे सेवन करावे. यामध्ये मोड आलेली मटकी, मुग यांचा समावेश करावा. पावसाळ्यात मिळणारा मका, दूध, काकडी, भोपळा, भाज्यांचा आहारात समावेश करावा. कंदमुळांमध्ये तुम्ही बीटचे सेवन करू शकता.

  • आठवड्यातून एकदा कोणता आहार घ्यावा?

बाजरीची भाकर , राजगिरा आठवड्यातून एकदा तरी खाणे आवश्यक आहे. मिळणाऱ्या हंगामी भाज्यांचा जेवणात समावेश करावा. . पावसाळ्यात जीभेचे चोचले पुरविणारे गरमागरम भजी देखील खावीत. याशिवाय मशरूम, बांबूपासून बनवलेली डिश किंवा दोन ते तीन महिने जुने लोणचे खाऊ शकता.

  • पावसाळ्यात फिट राहण्यासाठी काय करावे

कोमट पाणी प्यावे

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिणे फायदेशीर असते. पावसाळ्यात दुषित पाणी पिल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. यामुळे घशाच्या संसर्गाचा धोकाही कमी होतो.

हळदीचे दूध पावसाळ्यात फायदेशीर

हळदीचे दूध पिणे आरोग्यदायी मानले जाते. कोमट दुधात चिमूटभर हळद मिक्स कगुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामुळे रात्रीची झोप सुधारते आणि वेदना आणि थकवा दूर होतो.

फळांचे सेवन

पावसाळ्यात फळांचा आहारात समावेश करावा. फळ खाणे आरोग्यासाटी फायदेशीर असते.फळांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. सफरचंद, संत्री, केळी, पपई यासारखे फळ खावी.

लवंग-मिरपूड आणि दालचिनीचा काढा

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा रामबाण उपाय म्हणून काम करतो. पावसात इन्फेक्शनचा धोका खूप वाढतो, अशा वेळी डेकोक्शनचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि तुळशीच्या पानांपासून बनवलेला काढा तयार करून प्यावा. यामुळे घसा खवखवणे आणि अशा इतर समस्या दूर होतील आणि शरीर रोगांशी लढण्यासाठी मजबूत होईल.

तांब्याच्या भांडयातील पाणी पिणे

आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले असते. विशेषतः पावसाळ्यात तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावे. तांबे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi River Casino: मांडवीत नवा कॅसिनो येणार की रोखला जाणार? सरकार आणि कंपनीच्या दाव्यांमधील विसंगती न्यायालयासमोर उघड; भूमिकेवरच सवाल

Karnataka Goa Island Dispute: गोव्‍याच्‍या ताब्‍यातील 16 बेटांवर कर्नाटकचा दावा! केंद्राला पत्र, सीमावाद पेटणार

Horoscope 30 April 2026: अक्षय्य तृतीयेचा सुवर्णयोग! 'या' राशींंचं पालटणार नशीब, गुंतवणुकीतून मिळणार चांगला परतावा; मेहनतीला यशाची सुवर्ण जोड

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

SCROLL FOR NEXT