Monsoon Diet:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Diet: पावसाळ्यात 'या' पदार्थांचे सेवन टाळा अन् दूर ठेवा आरोग्याच्या समस्या

पावसाळ्यात निरोगी राहायचे असेल तर आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Monsoon Diet: पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात अनेक आजार डोके वर काढतात. पावसाळ्यात संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. बहुतेक जंतू या ऋतूमध्ये वाढण्याची शक्यता असते. यामुळे आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करु नये हे माहिती असले पाहिजे.

  • दुग्धजन्य पदार्थ

दही खाणे चांगले असते. पण पावसाळ्यात दही, ताक यासारखे दुग्धजन्य पदार्थ रोजच्या रोज टाळावेत. कारण पावसाळ्यात अन्नपदार्थांमध्ये बॅक्टेरिया फार लवकर वाढतात आणि दह्यात आधीच बॅक्टेरिया असतात. जर तुम्ही हे रोज म्हणाल तर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

  • कोशिंबीर

कोशिंबीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी पावसाळ्यात कच्च्या भाज्या खाल्ल्याने आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. काही भाज्यांमध्ये बॅक्टेरिया असतात, जे कच्चे खाल्ल्यास संसर्गाचा धोका वाढतो. पावसाळ्यात फक्त शिजवलेले अन्नच खावे.

  • जंक फूड

पावसाळ्यात जंक फूडपासूनही दूर राहिले पाहिजे. स्ट्रिट फूड खाल्यास मलेरियाचा धोका खूप वाढू शकतो. या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावते. म्हणून इडली,डोसा,जलेबी,दही वडा असे आंबवलेले पदार्थ खाणे टाळावे.

  • सीफूड

पावसाळ्यात सीफूडपासून दूर राहा कारण ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. पावसाळ्यात माशांचा प्रजनन हंगाम असून बाजारात उपलब्ध असलेले मासे ताजे नसतात. हे फ्रिज किंवा साठवणुक करुन ठेवलेले असतात. यामुळे याचे सेवन करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

  • पालेभाज्या

कोबी किंवा पालक हिरव्या पालेभाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत. कारण त्यात बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव आढळतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.निरोगी राहायचे असेल तर पावसाळ्यात पालेभाज्या खाणे टाळले पाहिजे.

  • तळलेले पदार्थ

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला अपचन आणि डायरियाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT