Palak Paneer Pakoda Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Breakfast Recipe: ब्रेकफास्टमध्ये बनवा चविष्ट पालक पनीर पकोडा!

पालकमध्ये अनेक पोषक पदार्थ असतात. यामुळे पालक खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Puja Bonkile

Palak Paneer Pakoda Recipe: रोज सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न असतो. नाश्त्यात हेल्दी खाणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पकोडे खाण्याची मज्जाच वेळी असते. तुम्ही नाश्त्यामध्ये पालक पनीर पकोडे ही हटके रेसिपी ट्राय करू शकता.

पालकमध्ये अनेक पोषक पदार्थ असतात. यामुळे पालक खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पोषक तत्वांनी युक्त पालक पनीर पकोडे तुमच्यासाठी सर्वोत्तम नाश्ता ठरू शकतात.चला तर मग जाणून गेऊया पालक पकोडे कसे बनवावे.

  • पालक पकोडा बनवण्यासाटी लागणारे साहित्य

पालकाची - १ जुडी

पनीर- १०० ग्रॅम

तांदूळ - २ चमचे

बेसन- ४ चमचे

तिखट- १ चमचे लाल

हळद- १/४ टीस्पून

ओवा- १ टीस्पून

हिरवी मिरची - २ टीस्पून

बारीक चिरलेले आले - १ चमचे

कोथिंबीर - २ चमचे

तेल - २ चमचे

मीठ चवीनुसार

  • पालक पनीर पकोडे बनवण्याची कृती

पालक पनीर पकोडा बनवण्यासाठी सर्वात पहिले पालक बारीक चिरून घ्यावे आणि पनीरही किसून घ्यावे. आता भांड्यात पालक आणि पनीर मिक्स करावे.

यानंतर बाऊलमध्ये बेसन, तांदूळ, लाल तिखट, हळद, ओवा, हिरवी मिरची, आले, तेल आणि चवीनुसार मीठ टाकावे.

आता सर्व साहित्य चांगले मिक्स करावे. यानंतर हाताला तेल लावून पालकाच्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवावे.

सर्व पकोडे तयार झाल्यावर डिप फ्राय करावे. कुरकुरीत आणि हेल्दी पालक पनीर पकोडे तयार आहेत. आता टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.


टिप: पकोड्याचे पीठ फार पातळ नसावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT