Monkeypox Virus Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monkeypox Virus: मंकीपॉक्स आजाराचे नाव बदलून 'एमपॉक्स' ठेवले; WHOचा मोठा निर्णय

Health: या व्हायरसचा संसर्ग डोळे, नाक किंवा श्वसनावाटे होऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

Health: वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनने मंकीपॉक्स या गंभीर आजाराचे नाव बदलून 'एमपॉक्स' (Mpox)ठेवले आहे. या आजाराचा संसर्ग जगभरात सुरु झाला तेव्हा भेदभाव, तिरस्कार, द्वेषाची भावना पसरत होती. अनेक देशांनी मंकीपॉक्स आजाराचे नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

त्यानंतर याविषयी विचारमंथन करुन संघटनेने हा निर्णय घेतला आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने पुढे सांगितले की, 1 वर्ष या आजाराची दोन्ही नावे वापरात असतील. मात्र नियोजनबद्ध रीतीने पुढे मंकीपॉक्स हे नाव पूर्णपणे रद्द केले जाईल.

जागतिक आरोग्य (Health) संघटना आपल्या नियमाप्रमाणे, कोणत्याही आजाराचे नाव हे त्या क्षेत्राशी संबंधित ठेवते. दरम्यान अनेक वेळा असं केल्यामुळे त्या क्षेत्राच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो. मंकीपॉक्स हा आजार माकडांद्वारे पसरला होता. आणि त्याचा उगम आफ्रिकेत झाला होता. अशावेळी या रोगाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही जातीय किंवा सांस्कृतिक समूहांचा अपमान होऊ नये हा नाव बदलण्या मागील हेतू आहे.

मंकीपॉक्स हा आजार अतिशय दुर्मिळ आहे. पुर्वी देवी रोगाची साथ ज्या व्हायरसमुळे आली होती त्याचाच हा उपप्रकार आहे, असं म्हणता येईल. या व्हायरसचा (Virus) संसर्ग डोळे, नाक किंवा श्वसनावाटे होऊ शकतो.

मंकीपॉक्स आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना आणि अस्वस्थपणा यांचा समावेश होतो. लागण झाल्यानंतर शरीरावर पुरळ येतात. पेशंट बरा झाल्यानंतर पण हे डाग तसेच राहतात.

मंकीपॉक्स झालेल्या पेशंटचे कपडे किंवा त्यांच्याशी थेट संबंध आल्यानंतर या रोगाची लागण होऊ शकते. या आजारावर कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नाहीत. पण उपाय म्हणून आजार रोखण्यासाठी अ‍ॅंटीव्हायरल, व्हीआयजी, स्माल पॉक्स वॅक्सिन वापरले जाते. युरोपीय देशांमध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT