Mobile  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Brain Tumor: स्मार्टफोन की सायलेंट किलर? सतत मोबाइलचा वापर वाढवतो ब्रेन ट्यूमरचा धोका? काय सांगतं संशोधन? वाचा

Mobile Phone Brain Tumor Risk: आजच्या काळात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण फोन वापरतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, मोबाईल वापरण्याचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो? मोबाईलच्या वापराने ब्रेन ट्यूमरचा धोका वाढू शकतो का?

Manish Jadhav

आजच्या काळात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण फोन वापरतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, मोबाईल वापरण्याचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो? मोबाईलचा वाढता वापर ब्रेन ट्यूमरसाठी कारणीभूत ठरतो का? आणि विशेष म्हणजे याचा धोका कसा टाळता येतो? चला तर मग यांविषयी सविस्तररित्या तज्ज्ञांकडून जाणून घेऊया...

दरवर्षी 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिन साजरा केला जातो, ज्याचा उद्देश लोकांना ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर आजारांबद्दल जागरुक करणे आहे. ब्रेन ट्यूमर ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये मेंदूच्या पेशी असामान्यपणे वाढतात, ज्यामुळे ट्यूमर तयार होतो. हे ट्यूमर दोन प्रकारचे असू शकतात.

ब्रेन ट्यूमरची लक्षणे

डोकेदुखी, उलट्या, झटके, अंधुक दृष्टी, स्मरणशक्ती कमी होणे आणि बोलण्यात अडचण येणे ही ब्रेन ट्यूमरची लक्षणे आहेत.

मोबाईल फोन आणि ब्रेन ट्यूमरचा संबंध

जीबी पंत हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. दलजीत सिंग सांगतात, मोबाईल फोनमधून निघणारे रेडिएशन, ज्याला रेडिओफ्रिक्वेन्सी (आरएफ) रेडिएशन म्हणतात, ते आपल्या मेंदूजवळ रिसीव्ह आणि ट्रांसमिट होतात, त्यामुळे काही लोकांना वाटते की या रेडिएशनमुळे ब्रेन ट्यूमर होऊ शकतो. तथापि, याचा थेट काहीही संबंध नाही. काही लोक असाही अंदाज लावतात की, मोबाईलमधून निघणारे रेडिएशन ब्रेन ट्यूमरचा धोका निर्माण करु शकतात.

संशोधन काय सांगते?

शास्त्रज्ञांनी या विषयावर अनेक वर्षांपासून संशोधन केले आहे. 2011 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) एक संस्था असलेल्या IARC (International Agency for Research on Cancer) ने मोबाईल फोनमधून निघणाऱ्या RF रेडिएशनला कर्करोगजन्य म्हणून वर्गीकृत केले. मोबाईल फोनमुळे ब्रेन ट्युमरचा धोका वाढतो, याविषयी कोणतेही ठोस पुरावे नाहीत.

अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले की, जे लोक खूप जास्त काळ (10 वर्षे किंवा त्याहून अधिक) मोबाईल फोन वापरतात त्यांना विशिष्ट प्रकारच्या ब्रेन ट्यूमरचा (जसे की ग्लिओमा) धोका किंचित वाढू शकतो. दुसरीकडे, अनेक मोठ्या आणि दीर्घ अभ्यासांमध्ये मोबाईल फोनचा वापर आणि ब्रेन ट्यूमरमध्ये कोणताही स्पष्ट संबंध आढळला नाही.

खबरदारी घ्यावी

मोबाईल (Mobile) फोनमुळे ब्रेन ट्यूमर होतो याचे कोणतेही ठोस पुरावे नसले तरीही सावधगिरी बाळगणे शहाणपणाचे ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT