Methi Mathri Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Methi Mathri Recipe: थंडीमध्ये चहासोबत आस्वाद घ्या मेथी मठरीचा

तुम्ही किटी पार्टी, पिकनिक आणि रोड ट्रिपमध्ये मेथी मठरी सोबत घेवून जावू शकता.

दैनिक गोमन्तक

मेथी मठरी (Methi Mathri) ही उत्तर भारतीय भागातील रेसिपी आहे. मेथी मथरी खास सणाला तयार केली जाते. यांची चव खारट असते. या कुरकुरीत मेथी मथरीचा तुम्ही कप गरम चहा किंवा कॉफीसोबत आनंद घेवू शकता. मैदा, तेल, मेथीचे पाने, ओवा आणि स्वादानुसार मीठ टाकून तयार केले जाते. हा पदार्थ स्नॅक्स (Snacks) म्हणून देखील करू शकता. खराब होऊ नये म्हणून हवाबंद डब्ब्यात ठेवावा. तुम्ही किटी पार्टी, पिकनिक आणि रोड ट्रिपमध्ये सोबत घेवून जावू शकता. हिवाळ्यात विविध हिरव्या पालेभाज्या येतात. यांचा आस्वाद आपण घ्यायलाच पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया मेथी मेथरी (Methi Mathri) बनवण्याची पद्धत

* मेथी मथरी बनवण्याचे साहित्य

  • मैदा - 2 कप

  • रिफाइंड तेल - 1/4 कप

  • पाणी - 1/4 कप

  • मेथीचे पान / 1/4 कप

  • ओवा - 1/4 कप

  • स्वादानुसार मीठ

कृती:

एका मोठ्या बाउलमध्ये मैदा, ओवा, मेथी, आणि मीठ घ्यावे. हे सर्व पदार्थ चांगले हाताने मिक्स करावे. नंतर या मिश्रणात रिफाइंड तेल मिक्स करावे. नंतर पीठ मळण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घ्यावे. यानंतर मऊ कापडाने 20 मिनिटे झाकून ठेवावे. यानंतर छोटे छोटे समान भाग करावे. प्रत्येक भाग एकसारखा गोल आकारात फिरवा आणि नंतर आपल्या हाताच्या तळव्यामध्ये थोडासा सपाट करा. शेवटी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे. एक एक मठरी सोनेरी- तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावे. तयार आहे तुमची स्वादिष्ट मेथी मठरी याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही चहा किंवा कॉफीसोबत सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT