Regulars Periods Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Regular Periods: मासिक पाळी नियमित राहावी म्हणून काय खाव अन् काय खाऊ नये?

नियमितपणे मासिक पाळी येण्यासाठी आहारात थोडा बदल करणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

तुम्हाला जर नियमितपणे मासिक पाळी येत नसेल तर यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.ही समस्या महिलांचे अंडाशय सुरळित कार्य करत नसल्याने उद्भवते. महिलांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यास अनेक बदल होतात.

अनेक महिला मासिक पाळी लवकर येण्यासाठी तर कधी लांबणीवर टाकण्यासाठी आणि गर्भधारण नियंत्रित करण्यासाठी औषधे घेतात. यामुळे नैसर्गिरित्या शरीरात होणाऱ्या प्रक्रियांमध्ये बदल केल्यास मासिक पाळी अनियमितपणे येऊ शकते. तसेच नियमितपणे मासिक पाळी येण्यासाठी पोषक आहारावर भर देणे गरजेचे आहे.

  • आलं

नियमितपणे मासिक पाळी येण्यासाठी आहारात आलं आणि हळद या पदार्थाचे सेवन करावे. या दोन्ही पदार्थांमध्ये पोषक घटकांचा समावेश असून अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

  • बीन्सचे सेवन करावे

महिलांच्या शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही अनिमित मासिक पाळीची समस्या निर्माण होते. म्हणूनच अनेक प्रकारच्या बीन्सचे सेवन आहारात करावे.बीन्समध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे नियमितपणे मासिक येण्यास मदत मिळते.

  • बाजरीचे पदार्थ

महिलांनी आहारात गव्हापेक्षा बाजरीचे सेवन करावे. यामुळे इन्सुलिन आणि हार्मोन्स संतुलित राहतात. यामुळे मासिक पाणी नियमितपणे येते.

  • जंक आणि प्रोसेस्ड फूड

जंक आणि प्रोसेस्ड फूडचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असते. कारण यामुळे महिलांच्या शरीरातील हार्मोन्सवर विपरित परिणाम होतो. कॉर्न फ्लेक्स, सॉस,जाम यासारख्या पदार्थांचे सेवन टाळावे. यामुळे मासिक पाळी नियमित येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

SCROLL FOR NEXT