Sooji Halwa Recipe in Marathi  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sooji Halwa Recipe : झटपट होणारा आणि बनवायला सोपा असा चविष्ट 'सूजी हलवा'

Sooji Halwa Recipe in Marathi : जेव्हा तुम्हाला लगेच गोड खावेसे वाटेल तेव्हा तुम्ही 'सूजी हलवा' बनवू शकता.

दैनिक गोमन्तक

Sooji Halwa Recipe : आपल्या सगळ्यानाच गोडधोड पदार्थ खायला आवडतात. अनेक गोडाचे पदार्थ बनवायला तितकाच वेळ द्यावा लागतो. मात्र काही पदार्थ तुम्ही कमी वेळात आणि मोजक्या साहित्यातही बनवू शकता. जेव्हा तुम्हाला लगेच गोड खावेसे वाटेल तेव्हा तुम्ही 'सूजी हलवा' बनवू शकता. तो खूप झटपट, बनवायला खूप सोपा आणि खायला खूप चविष्ट आहे.

(Sooji Halwa Recipe in Marathi)

सूजी हलव्यासाठी लागणारे साहित्य

रवा - अर्धा कप

देशी तूप - 60 - 70 ग्रॅम (1/3 कप)

साखर - अर्ध्या कपापेक्षा थोडे जास्त

काजू - 10-12

मनुका - 5-6

छोटी वेलची - 4 (ठेचून पावडर बनवा)

बदाम - 8-10

लागणारा वेळ - 20 मिनिटे

कृती :

  • गॅसवर तवा ठेवा आणि त्यात तूप टाका. तूप गरम झाल्यावर त्यात रवा टाका आणि ढवळत असताना रवा तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. थोड्या वेळाने गॅस मंद करून हलका गडद तपकिरी होईपर्यंत भाजा.

  • रवा भाजल्यानंतर त्यात 2 वाट्या पाणी आणि साखर घालून मिक्स करा. हलवा मंद गॅसवर शिजू द्या. मध्येच हलवा परतत राहा.

  • दरम्यान, सुका मेवा चिरून घ्या.

  • हलव्यात चिरलेला काजू-बदाम आणि बेदाणे घालून मिक्स करा. नंतर त्यात वेलची पावडर घालून रवा चांगला हलवून घ्या. उरलेले तूप हलव्यात घालून मिक्स करा. तूप घातल्यावर हलवा मऊसर होऊन छान लागतो.

  • पाणी आटल्यावर गॅस बंद करा आणि सूजी हलवा एका भांड्यात काढा. त्यावर तुम्ही वरून सुकामेवा टाकू शकता. गरमागरम सूजी हलवा तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT