PCOS vs PCOD Treatment : कसा ओळखाल PCOS-PCOD मधील फरक? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

आजकाल PCOS आणि PCOD हे मुली आणि स्त्रियांमध्ये सामान्य आजार झाले आहेत.
PCOS vs PCOD Treatment
PCOS vs PCOD Treatment Dainik Gomantak
Published on
Updated on

आजकाल PCOS आणि PCOD हे मुली आणि स्त्रियांमध्ये सामान्य आजार झाले आहेत. हे बहुतेक 18 ते 35 वयोगटातील मुलींमध्ये दिसून येतात. अनियमित मासिक पाळी हे PCOS आणि PCOD या दोन्हींचे सामान्य लक्षण आहे. PCOD पेक्षा स्त्रियांमध्ये PCOD अधिक सामान्य झाले आहे. या दोघांमधला फरक आणि त्यावरील उपाय जाणून घेऊयात.

PCOS vs PCOD Treatment
Hair Growth Tips : केसांच्या वाढीसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

PCOS म्हणजे काय?

पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (Polycystic Ovarian Syndrome). हा एक गंभीर आजार आहे. यामध्ये मेटाबॉलिक आणि हार्मोनल असंतुलन जास्त असते. ज्या मुली किंवा महिलांना दीर्घकाळ मासिक पाळी येत नाही त्यांना PCOS होण्याची शक्यता जास्त असते. ही समस्या रजोनिवृत्तीपर्यंत टिकू शकते.

PCOS च्या स्थितीत, पुरुष हार्मोन टेस्टोस्टेरॉनचे स्राव स्त्रियांमध्ये आढळून येतात. यामुळे ओव्हुलेशनमध्ये अनियमितता येते. ही समस्या अनुवांशिक देखील असू शकते. पीसीओएस PCOD पेक्षा अधिक गंभीर असू शकते.

PCOS
PCOSDainik Gomantak

PCOD म्हणजे काय?

पीसीओडी म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (Polycystic Ovary Disorder). ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये अंडाशय वेळेपूर्वीच अंडी सोडतात. पीसीओडीच्या बाबतीत महिलांच्या अंडाशयाचा आकार मोठा होतो. PCOD हा स्त्रियांमध्ये अ‍ॅन्ड्रोजन (पुरुष संप्रेरकांच्या) जास्त झाल्यामुळे होणारा विकार आहे.

PCOD आणि PCOS लक्षणे

  • अनियमित मासिक पाळी

  • अनियमित रक्तस्त्राव

  • मुरुम

  • वजन वाढणे

  • केस गळणे

PCOD
PCODDainik Gomantak

पीसीओएस आणि पीसीओडीमधील फरक

PCOS आणि PCOD या दोन्ही वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. या दोघांची सुरुवातीची लक्षणे आणि उपचार सारखेच आहेत. सुरुवातीला जीवनशैलीत बदल करून दोन्ही आजार बरे होऊ शकतात. PCOS आणि PCOD मधील फरक जाणून घ्या :

  • PCOS हा एक गंभीर आजार आहे. PCOD ही एक सामान्य स्थिती असली तरी जीवनशैलीत बदल करूनही तो बरा होऊ शकतो.

  • सकस आहार, योगासने किंवा व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून PCOD बरा होऊ शकतो. तर PCOS हा चयापचय विकार आहे. यामध्ये जीवनशैलीत बदल करण्यासोबतच औषधे घेणेही आवश्यक आहे.

  • जगभरातील लाखो महिलांना PCOD च्या समस्येचा सामना करावा लागत आहे. म्हणजेच, ही एक सामान्य समस्या आहे. तर PCOD पेक्षा खूपच कमी स्त्रियांमध्ये PCOS दिसून येते.

  • PCOS च्या बाबतीत गर्भधारणा होण्याचा किंवा गर्भपात होण्याचा धोका असतो. तुलनेत PCOD असणाऱ्या महिलांना गर्भधारणा होऊ शकते.

  • PCOS असल्‍याने गरोदरपणात मधुमेह होण्‍याचा धोका वाढतो. PCOS वर वेळेवर उपचार न केल्यास गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

  • PCOS हा अंतःस्रावी प्रणालीचा विकार आहे. यामुळे हार्मोनल विकार होऊ शकतात. PCOD हे त्याचे प्रारंभिक लक्षण असू शकते.

PCOD आणि PCOS कसे टाळावे?

आजकालचा वाढता ताण, व्यस्त जीवनशैली यामुळे महिलांमध्ये अनेक समस्या जन्माला येत आहेत. यामध्ये PCOD आणि PCOS यांचाही समावेश आहे. पण काही गोष्टींची काळजी घेतली तर PCOD आणि PCOS टाळता येऊ शकतात.

  • तणाव, चिंता कमी करा.

  • वजन नियंत्रणात ठेवा.

  • निरोगी खाण्याच्या सवयी पाळा.

  • तुमच्या जीवनशैलीत योग किंवा व्यायामाचा समावेश करा.

  • नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com