Makar Sankranti Special Til Rewari Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makar Sankranti Til Rewari: मकर संक्रांतीला घरीच बनवा स्वादिष्ट तिळाची रेवडी!

तुम्हाला सुद्धा यावेळी काहीतरी वेगळे बनवायचे असेल तर तुम्ही तिळाची रेवडी बनवू शकता.

दैनिक गोमन्तक

Makar Sankranti Recipe: मकर संक्रांती दोन-तीन दिवसांवर येउन ठेपली आहे. यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. प्रत्येक घरात तिळगुळ आणि तिळाचे वेगवेगळे प्रकार बनवण्याची सुरुवात झाली आहे.

  • तिळाची रेवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

भाजलेले पांढरे तीळ - अर्धे कप

साखर - 1 कप

लिंबाचा रस - 1 टीस्पून

केवडा इसेन्स - 1 टीस्पून

बटर पेपर

पाणी - अर्धा कप

कॉर्न सिरप - 2 टीस्पून

विलायची पावडर - 2 टीस्पून

  • तिळाची रेवडी कशी बनवायची

मकर संक्रांतीसाठी तिळाची रेवडी बनवण्यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात पाणी आणि साखर टाकून गॅसवर ठेवा.

साखर विरघळल्यावर त्यात कॉर्न सिरप टाकून घट्ट मिश्रण तयार करा.

जर तुम्हाला कॉर्न सिरप वापरायचा नसेल तर एक तारी पाक तयार करा.

कॉर्न सिरप घातल्यानंतर मिश्रण सतत ढवळत राहा.

मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात केवडा इसेन्स टाकावे.

मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात तीळ घालून मिक्स करा.

तिळाचे मिश्रण थोडे थंड झाल्यावर बटर पेपरवर पसरवा.

मिश्रण थोडं थंड होऊन कोरडं झाल्यावर हाताने फोडून घ्या आणि हव्या त्या आकाराच्या रेवड्या तयार करा.

तुमची मकर संक्रांती स्पेशल तिळाची रेवडी तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SAFF Championship: पाकिस्तानविना गोव्यात रंगणार 'सॅफ फुटबॉल स्पर्धा'; यजमान भारत, गतविजेत्या बांगलादेशसह एकूण सहा महिला संघांत चुरस

Omkar Elephant: 'ओंकार' पोचला उगाडे - सिंधुदुर्गात... सीमोल्लंघन सुरूच; पेडणे वन कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा

SCROLL FOR NEXT