Madras Thorn Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Madras Thorn: विलायती चिंच मधुमेहावर रामबाण उपाय

Madras Thorn: झाडाच्या सालाचा काढा आपणास अनेक पोषक घटक पुरवतात.

दैनिक गोमन्तक

Madras Thorn: सगळ्याच फळांचे आपल्या शरीरासाठी काहीतरी फायदे असतात. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे महत्वाची भूमिका बजावतात. ताजेतवाणे राहण्यासाठी , रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी निरोगी राहण्यासाठी विविध प्रथिने शरीरास मिळणे महत्वाचे असते. आज आपण बघणार आहोत विलायती चिंचेचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत.

व्हिटॅमिन सी, प्रथिने, चरबी, कर्बोदकांमधे, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, थायामिन, राइबोफ्लेविन सारख्या अनेक घटकांनी समृद्ध आहे. याच्या झाडाच्या सालाचा काढा आपणास अनेक पोषक घटक पुरवतात.

  • प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत

विलायती चिंचेत व्हीटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असते. ही चिंच आपण नेहमी खात असू तर आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

  • डोळ्यांच्या आरोग्यासाठी

डोळ्यांच्या अनेक समस्यांवर विलायती चिंच महत्वाची ठरते. आज लहानांपासून मोठ्यापर्यत अनेकांना डोळ्यांच्या समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्यासाठी विलायती चिंच फायदेशीर ठरते.

  • मधुमेहावर रामबाण उपचार

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, ज्यांना शरीरातील साखरेचे प्रमाण करायचे आहे त्यांच्यासाठी विलायती चिंच महत्वाची आहे. जर महिनाभर विलायती चिंच खाल्ली तर मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.

  • कॅन्सरच्या रुग्णांसाठी फायदेशीर

कर्करोगाच्या रुग्णांसाठीही ही विलायती चिंच फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेले घटक अँटीऑक्सिडंट, अँटीइन्फ्लेमेटरी, अँटीडायबेटिक कॅन्सरसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

  • पोटाच्या सर्व समस्यांवर उपयोगी

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की विलायती चिंच पाचक प्रणाली मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून, ज्यांचे पोट शुद्ध होत नाही त्यांनी या फळाचे सेवन करायला पाहिजे.

विलायती चिंच दुर्लक्षली जाते मात्र विलायती चिंचेचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT