Lunar Eclipse 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lunar Eclipse 2022: 16 मे ला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण, जाणून घ्या तारीख अन् वेळ

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 16 मे रोजी होणार आहे

दैनिक गोमन्तक

वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणानंतर आता या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 16 मे रोजी होणार आहे. वार्षिक पूर्ण चंद्रग्रहण लालसर रंगामुळे त्याला 'सुपर फ्लॉवर ब्लड मून' म्हटल जात आहे. जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा एक सुंदर रंगीत ब्लड मून तयार होतो, ज्यामुळे चंद्राला लालसर रंग मिळतो.

याव्यतिरिक्त, हा एक सुपरमून असेल जो उत्तर अमेरिकेतील बहुतेक भागांमध्ये एकूण चंद्रग्रहणाशी एकरूप होईल. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण अशुभ मानले जाते. या काळात अनेक शुभ कार्य करणे टाळतात. (Lunar Eclipse 2022 News)

* चंद्रग्रहण वेळ कोणती ?

भारतीय वेळेनुसार, चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी सकाळी 8.59 ते 10.23 पर्यंत असेल. चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ येथे वैध राहणार नाही

* कुठे दिसणार चंद्रग्रहण ?

वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात (India) दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ येथे वैध राहणार नाही. मात्र, हे ग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, उत्तर अमेरिकेचे अनेक भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिकामध्ये पाहता येईल. (Super Flower Blood Moon News)

* चंद्रग्रहण म्हणजे काय?

जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर (Moon) पडते तेव्हा त्याला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रग्रहण ही खगोलीय स्थिती आहे. जेव्हा पृथ्वी फिरत असताना चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते. या काळात सूर्य, पृथ्वी आणि चंद्र सर्व एका सरळ रेषेत येतात, त्यामुळे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत नाही आणि त्या वेळी चंद्र पृथ्वीवरून दिसत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT