केदारनाथ मंदिर हे हिंदूंच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे मंदिर उत्तर भारतामध्ये वसलेले आहे. दरवर्षी लाखो भाविक विविध राज्यातून केदारनाथ मंदिरात शिवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. हे मंदिर खूप उंचावर आहे, त्यामुळे हवामानाचा विचार करता मंदिराचे दरवाजे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच उघडले जातात. त्यानंतर बर्फवृष्टीमुळे मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद करण्यात येतात. (Kedarnath Yatra Tips News)
केदारनाथ धामचे दरवाजे 3 मे 2022 रोजी भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे पूर्ण दोन वर्षांनी केदारनाथ धामची यात्रा सुरू झाली, त्यानंतर भाविकांच्या गर्दीने सर्व विक्रम मोडले आहे.
जर तुम्ही केदारनाथ धाम यात्रेची योजना आखत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. केदारनाथ यात्रेला जाताना तुम्ही काय करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेऊया.
* जर तुम्ही केदारनाथ धामला जाण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा की हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त जाणे टाळा.
* डोंगराळ भागात पावसाळ्यात पूर किंवा भूस्खलनाचा धोका खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत या काळात प्रवासाचे नियोजन करू नका.
* केदारनाथला जाताना हे लक्षात ठेवा की तुम्ही उन्हाळ्यात जात असाल तरीही हिवाळ्यातील कपडे सोबत घेऊन जा.
* या भागामध्ये कधीही पाऊस पडू शकतो, यामुळे प्रवासाला जाताना छत्री, रेनकोट सोबत ठेवा.
* सामान्य माणसाला गौरीकुंड ते केदारनाथ धाम जायला एकूण 5-6 तास लागतात, त्यामुळे घाई न करता आरामात चालत जा. चालताना चेंगराचेंगरी करू नका अन्यथा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
* तुमचा प्रवास सकाळी लवकर सुरू करा जेणेकरून तुम्ही दिवसभर आरामात केदारनाथ धामला पोहोचू शकाल. दर्शनानंतर येथे रात्रीची विश्रांती घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीकुंडकडे परतीचा प्रवास सुरू करा.
* केदारनाथ यात्रेदरम्यान 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कधीही घेऊन जाऊ नका. कारण याठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाणही खूप कमी असल्याने मुलांचे आरोग्य बिघडण्याची भीती असते.
* केदारनाथ यात्रेला जाताना BSNL, Vodafone आणि Reliance Jio चे सिम सोबत ठेवा.
* तुमचे प्रवास कार्ड आणि आधार कार्ड सोबत ठेवायला विसरू नका.
* रात्री केदारनाथ मंदिरात जाणे टाळा कारण रात्री जंगली प्राण्यांपासून धोका असू शकतो.
* सहलीला जाण्यापूर्वी फ्लॅशलाइट आणि अतिरिक्त बॅटरी सोबत ठेवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.